शुद्ध सत्य जग / बालके जाणती /
पुटे ती चढ़ती / काळासवे //१//
जाणा तुम्ही मोल / निरभ्रपणाचे /
मळभ वरचे / नष्ट करा //२//
जग आहे चित्र / अर्थहीन साचे /
सुख सौन्दर्याचे / त्यात नाचे //३//
राग, दुःख, मोह /निपटून सारे /
पहा चित्र खरे / निव्वळ ते //४//
अलिप्त निर्लेप / फ़क्त कुतूहल /
काय हालचाल / जगी चाले //५//
आपल्या मनाची / कोरी ठेवा पाटी /
ही जगरहाटी / चाले पुढे //६//
कशाची ना मागे /निशाणी ठेवते /
सदा बदलते / चित्र जग //७//
हेतूचा आग्रह / हे असे अज्ञान /
काढता झाडून / ज्ञान उरे //८//
मनामधे ठेवा / फ़क्त उत्सुकता /
निष्कर्ष कोणता / काढू नका //९//
हरेक आकार / रंगांचे प्रकार /
रिकामे अंतर / पहा फ़क्त //१०//
मोकळ्या डोक्यात / स्वच्छ नजरेत /
काही ना खुपत /दूर राही //११//
सजीव निर्जीव / सारे वस्तुमात्र /
फेकती सर्वत्र / सुखप्रभा //१२//
चराचरी राम / हेच गुप्तधन /
मिळेल शोधून / समाधान //१३//
मंगळवार, २५ डिसेंबर, २००७
रविवार, २ डिसेंबर, २००७
आवर
तुम्हासमोर मी / आळवितो राम /
रसाळ हे नाम / विठोबाचे //१//
आनंदविभोर / मयूर होउन /
नाचतो पाहून / घन नीळे //२//
कोकीळ कुजन / करतो सुखाने /
ऐकावया गाणे / आम्रतरू //३//
आम्ही विठोबाचे / सुखे गाऊ भाट /
तुम्हा किटकिट / होवो भली //४//
देताल तरी द्या / दंड शरीराला /
आवर मनाला / कसा घालू //५//
रसाळ हे नाम / विठोबाचे //१//
आनंदविभोर / मयूर होउन /
नाचतो पाहून / घन नीळे //२//
कोकीळ कुजन / करतो सुखाने /
ऐकावया गाणे / आम्रतरू //३//
आम्ही विठोबाचे / सुखे गाऊ भाट /
तुम्हा किटकिट / होवो भली //४//
देताल तरी द्या / दंड शरीराला /
आवर मनाला / कसा घालू //५//
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
