रविवार, १ नोव्हेंबर, २००९

SHIRDI KE SAIBABA Deepavali manaai suhani. Hi Res

Saikripaase yeh deep jale hai.

Sumar Manva - Shirdi Ke Sai Baba

Sai teri ichchhaa.

Sai Bhola Bhandari

मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।
क्षीणाग्रमूल मध्याय नम: पूर्णाय शंभवे ।।


हरे साईं हरे राम हरे कृष्ण

Sai Naath Tere Hazaaron Haath (Tuhi Faqir)

ॐ सहस्त्रशिरोरुबाहवे सहस्त्रयुगधारिणे नम:

साईचरणी नमन .

Sai Baba Bolo - full

Many many thanks to Sai for sending this cinema to us.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २००९

Ae maalik tere bande hum



अहं
निर्विकल्पो निराकाररुपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम्
सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्ध:
चिदानंदरूप: शिवोऽम् शिवोऽम्

सोमवार, १९ ऑक्टोबर, २००९

स्नेहसुख


अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम्
सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्ध:
चिदानंदरूप: शिवोऽहम् शिवोऽहम्


शिव भजे रामास /राम भजे शिवास /
आत्मस्तुति दोष /घेइनात //१//

जरी दोघे एक /परब्रह्मरूप /
दुस-याचा जप /करतात //२//

आपण कशाला /भांडत रहावे /
दुस-याला द्यावे /स्नेहसुख //३//

अंती तो ईश्वर /एक हे जाणावे /
हिताला जपावे /परस्परां //४//

मीपणा सोडून /दुजास पुजती /
देवांची ही मति /ध्यानी धरा //५//


भक्त



कृष्ण म्हणे जी मी भावाचा भुकेला
भक्ताच्या प्रेमाला धाकुटे न म्हणे

त्याचा प्रतिपाळ करी आर्ति पुरवी
त्यासी मजमाजी मिळवी हाती धरुनी

भक्त जाय तेथे मी पाठीपोटी असे
पापण्यात डोळियाजैसे सांभाळी सदा

त्याची इच्छा माझे ब्रीद माझे कार्य त्याचे यश
मज एकावाचुन त्यासी अन्य कोणी नसे

त्याचे जीवन माझे चरित्र मी चैतन्य तो गात्र
त्याचे गोत्रकलत्र सारे मीच होई

तो अनन्य अव्यभिचारी भक्तीसी पात्र
आणि मी परतंत्र त्याचा चाकर होई



रविवार, १८ ऑक्टोबर, २००९

युद्ध ?



युद्धाचे वेड तुम्हाला
शब्दांचे ओझे मजसी
ना कोमेजाव्या कळ्या
झिरपावे प्रेम मुळासी

राहता तुम्ही शेजारी
काळीज नाही उमगले
का वाचविण्या कोंबडे
रस्ते रक्ताने भिजले

ही कसली अहिंसा तुमची
हिंसेची झाली दासी
धर्माच्या नावावरती
देता धर्माला फाशी

शब्दाने ह्रदय हलावे
शस्त्राची काय मिराशी
पेटवू नका ही घरे
पेटवली चूल पुरेशी

ह्रदयाला गार करावे
तत्वालाही मुरडून
भिजलेल्या मातीमध्ये
येते जीवनही फुलून

शनिवार, १७ ऑक्टोबर, २००९

सूर



कल्पतरुच्या पायतळी
मी बसुनी गातो गाणे
सापडला सूर जिण्याचा
आनंदी मुक्त तराणे

नाही मज द्वेष कुणाचा
नाही भीती मरणाची
मुठभर सात्विक अन्न खाऊनी
चढे साय तृप्तीची

नाही उरली आकांक्षा
जे आहे तेच भरपूर
ना देतो त्रास कुणाला
मज किडा मुंगीही मित्र

नाही बुद्धीला ताण
वा नाही मनी संताप
मज शत्रु न वैरी कुणीही
नाही कसलाही व्याप

मी माझ्यापुरती जागा
घेतली करुनी साफ
आहे तो क्षण मोलाचा
जे मिळे सहज ते खूप

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

शारदीय नवरात्रोत्सव



हे माते शारदे,
तू परब्रह्मस्वरूपिणी आहेस
तू आम्हां सारस्वतांची माता सरस्वती आहेस
तशीच तू वैष्णवांची माता लक्ष्मी आहेस
व तूच शैवांची माता दुर्गा आहेस

तुझ्या अनुज्ञेशिवाय आम्हाला
सच्चिदानंद परमपित्याचे
दर्शन होत नाही
हे देवी, तू तुझ्या कृपाकटाक्षाने
माझ्या आज्ञाचक्रास स्पर्श करुन
मला ज्ञानदृष्टी प्रदान केलीस

हे माते ,मी त्रिनेत्र गणेश
माझ्या ऋद्धि सिद्धि सह
तुझ्या चरणी नमन करतो
नवविधा भक्तिरूपी माझ्या र्हिदयसिंहासनी
विराजमान हो व मला पावन कर

शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

ऐक्ययोग

भेदभाव सारे /गेले विलयाला /
ऐक्याच्या गुढीला /उभारले //१//

विद्वेषाचे तण /मोडून टाकले /
आणि निवडले /आत्मज्ञान //२//

ज्ञानाचे अंजन /दृष्टिला फावले /
निधान दिसले /ऐक्ययोग //३//

प्रकाशाच्या वाटा /पुढे दिसतात /
मनोमिलनाचा /सण नामी //४//

तुझ्यासाठी देवा /गोडधोड करू /
उपासना करू /प्रसन्न हो //५//

अनंत तू देवा /अनंत हे ज्ञान /
अनंत हे सण /आम्हांसाठी //६//


गोडी


तुझे विश्वरूप /भव्यदिव्य जरी /
निर्गुणा इश्वरा /निराकारा //१//

समचरण दावी /पंढरीच्या नाथा /
टेकविण्या माथा /आसुसलो //२//

वाजे टाळघोळ /नामाचा गजर /
नाचती आतुर /भक्त तुझे //३//

गरुडाला खेव /देऊ होऊ मुक्त /
दर्शनाने तृप्त /तुझ्या होऊ //४//

नाही तू कृपण /सगुण संपन्न /
साकार होऊन /धन्य करी //५//

संशय आम्हाला /तिळभर नाही /
सगुण निर्गुण /तूच आहे //६//

शिव आणि विष्णु /भेद नसे काही /
ज्ञानदृष्टि पाहि /एक देव //७//

डोळे उघडून /पहा ज़रा सत्य /
काबा व काशीत /तोच आहे //८//

का देता बुद्धीस /वाउगा हा ताण /
साखर चाखून /गोडी पहा //९//

Om Jai Jagdish Hare ( Golden voice of Lata Mangeshkar )(must listen)

Sai teri kripaa.

रविवार, ६ सप्टेंबर, २००९

श्रीकृष्ण वंदन


मूकं करोति वाचालं
पंगुं लंघयते गिरिम्
यत्कृपा तमहं वन्दे
परमानन्दमाधवं

हरि ॐ तत् सत्


लढाई

कृपेमुळे तुझ्या /ध्यानी आले आता /
लढावे मी स्वत: /माझ्याशीच //१//

माझ्या दुर्गुणांशी /व्हावे मी निष्ठुर /
करावे मी ठार /अवगुण //२//

अज्ञानाच्या योगे /आसुरी संपदा /
बनते आपदा /माझी मला //३//

सहनशील मी /क्षमाशील जरी /
दुर्गुणांशी तरी /वज्र व्हावे //४//

पिकास पोसावे /तण निपटावे /
क्षेत्रपाळ व्हावे /विश्वक्षेत्री //५//

हेच कर्म माझे /हा न्याय तुझाही /
तळी क्षोभाच्याही /आपुलकी //६//

फणफणे जेव्हा /दैत्य अंहकार /
ही गदा उदार /मुक्ती देई //७//

सारेच उपाय /खुंटतात जेव्हा /
तुझे बळ तेव्हा /संचारते //८//

अन्यथा मी नाही /कर्म कर्ता भोक्ता /
सकळां पाहता /तूच दिसे //९//

माझ्यासह सारे /विश्व तूच आहे /
खेळत तू राहे /आत्मानंदी //१०//

गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

अमरत्व



येणे जाणे आभास
नित्यता अबाधित आहे
मारणार कोण कुणाला
थांबेल फक्त हा श्वास

शुन्यातुन कोण आले का
शुन्यात कोण मिळणार
आस्तित्व सदोदित आहे
करू नको शोक हा फुका

हा खेळ युगानुयुगांचा
हे व्यक्त मिळे अव्यक्ता
बदलते दशा ही फक्त
फरक हा रंगरुपाचा

येईल पुन्हा जन्माला
अव्यक्तच रंगरुपाला
हे चक्र जगाचे चाले
पडणार खंड ना याला

जाणीव ही नित्यत्वाची
होणेच पुरेसे आहे
मग शोक दु:ख तक्रार
नाही उरणार कशाची

धर्मक्षेत्र




हे शत्रुसैन्य जमलेले
केवळ पेंढा भरलेले
संकल्प आहे हा माझा
यश तुझे आहे ठरलेले

उन्मत्त माजलेल्यांना
करूणा नाही कामाची
मी तुझा सारथी झालो
मारून टाक तू यांना

हे अधम पातकी वीर
झालेत भूमीला भार
अवतरलो आपण आता
धर्माला सावरणार

कर्माची खंत कशाला
पूर्णकाम मी असुनीही
उतरलो रणात सदेह
झुंजणे खेळ हा आपुला

करणारा मी हे जाण
तू निमित्त हो मरणाला
साम्राज्य पाहते वाट
हे नव्हे युद्ध हे पुण्य

बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

सुखकर्ता बाप्पा आला



नामघोष
दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

गुलाल माखला
घोळका नाचला
ताशा तडाडला
ढोल दणाणला

नामघोष दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

गणेश सजला
रथात बसला
मंडपी आणला
सण सुरु झाला

नामघोष दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

पूजा आरतीला
मोदक खायला
भक्त आनंदला
चौक उजळला

नामघोष दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

ॐ गं गणपतये नम:

शनिवार, २२ ऑगस्ट, २००९

देव

सकळां अंतरी /उपजे जिव्हाळा /
अंकुर कोवळा /तोचि देव //१//

विंझणवारा जो /जिवाला ओलावा /
सावली गारवा /तोचि देव //२//

भाकरीचा घास /दुस-यास देतो /
संतुष्ट जो होतो /तोचि देव //३//

मायेची ममता /पाठीवर हात /
गोड जो बोलत /तोचि देव //४//

ज्याच्याकडे नाही /हाव मोठेपण /
होतो जो लहान /तोचि देव //५//

विनातक्रार जो /दु:ख पचवितो /
मदत करतो /तोचि देव //६//

सदा समाधानी /नाही अभिमानी /
सहज जो ज्ञानी /तोचि देव //७//

मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

सवाल

श्रद्घा................................................सबुरी
त्रिविध
या तापांनी
आटत जे नाही
दुनियेच्या प्रेमाला
काय म्हणावे

दु:ख एकट्याचे
सोसले असते
यांच्या कळवळ्याला
काय करावे

नाही बोलणार
ठरवले होते
फुटलेल्या बांधाला
कसे रोखावे

देवा तुझ्यापुढे
मी नाही एकटा
जन समाजाला
काय सांगावे

सवाल पुष्कळ
सोडव झडकरी
असे तुला तरी
कसे म्हणावे

शनिवार, १५ ऑगस्ट, २००९

वादा

//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //


का रे पांडुरंगा /भाव खातो जादा /
तोडतोस वादा /भेटेना तू //१//

आमच्या अश्रुंची /तुज ना किंमत /
बैस पिंज-यात /बडव्यांच्या //२//

जग व्यापणा-या /तुझी सोवळ्यात /
शुद्धी करतात /थट्टा तुझी //३//

महिषासारखे /वेद रेकतात /
अर्थाची ते खंत /करिनात //४//

मनामधे भाव /जळाची ओंजळ /
पान फूल फळ /तुला पुरे //५//

हमेशा आमच्या /असतो सन्निध /
त्यांनासुद्धा बोध /होऊ दे ना //६//

सर्वांघटी शुद्ध /समान श्रीहरी /
नांदे चराचरी /नारायण //७//

ॐजय जय राम कृष्ण हरीॐ

शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

Man Tarpat Hari Darsan ko Aaj

This is a very special song in the history of Indian cinema changing the taste of people from western style to the Indian classical and devotional blend. Thanks to the trio {Shakeel Badayuni, Naushad and Mohammed Rafi}.

रविवार, २६ जुलै, २००९

पंगत

नामसंकीर्तन /अमृताचे ताट /
का पाहता वाट /यावे खावे //१//

पंगत वाढली /खावे पोटभर /
सुखाचा ढेकर /नाम घ्यावे //२//

सगळ्यांना खुली /जेवणावळ ही /
आचपेच नाही /सुखे खावे //३//

कष्टाने रांधले /तुमच्याचासाठी /
पळु नका पाठी /पुढे यावे //४//

घास भरवाया /तुमच्या मुखात /
देव हा जागत /जीवेभावे //५//

रविवार, १९ जुलै, २००९

सुखाची साय

हरिर्हदयात आलो
हरिमध्ये सामावालो
तल्लिनतेस भेटलो
शून्य होउनी

आनंदब्रह्मी बैसलो
शब्दांस मी दुरावलो
स्वकायेमध्ये जाहलो
पाहुणा जैसा

डोलतो मी आपोआप
भाररहित स्थितीत
सूर्यप्रभा व्यापतात
देह जाणिवा

सवाद्य गीत सुस्वर
देई दृष्टांत ईश्वर
येई सुवास सुंदर
अलौकिकाचा

द्वैतउपाधि फिटली
सद्गुरुकृपा लाभली
सुकृते फळासि आली
पुर्वसुरींची

अनुभवामृतावरी
सुखाची साय चढली
ती तुम्हांस सांगीतली
चव चाखा हो



मंगळवार, १४ जुलै, २००९

प्रसाद

नाचू किर्तनाचे रंगी / ज्ञानदिप लावू जगी /

ओठांच्या किर्तनाशी
पायांच्या नर्तनाचे
ईमान बांधले आहे

रडगाणे दूर करून
हसण्याचा व हसविण्याचा
चंग बांधला आहे

माझ्या हातात दिवटी आहे
दृष्टि आहे, दिशा आहे
पुढे सच्चिदानंद आणि
सभोवार समाज आहे

जागर चालू आहे देवा
साजरी करून घ्यावी सेवा
माझे भरित रोडगे घेउन
तुझा प्रसाद मला द्यावा

येळकोट येळकोट जय मल्हार

शुक्रवार, १० जुलै, २००९

बोल काही तरी

देवा बोल काही तरी /म्हण राम कृष्ण हरी /
माझे टाळके दुखते /झोप मजला न येते /
मन झाले भिरी भिरी /म्हण राम कृष्ण हरी /
तुझ्या नामाविन देवा /अन्य काही न रुचते /
काम तुझे करतो मी /डोके माझे रे शिणते /
जरा बसतो एकटे /काही मज न सुचते /
आता पुरे झाले देवा /घेतो थोडा मी विसावा /
थकवा हा दूर करी /म्हण राम कृष्ण हरी /
येवो माझी तुज दया /अगा पंढरीच्या राया /
माथ्यावरी कर धरी /माझा शिणभाग हरी /
मजसवे वार्ता करी /म्हण राम कृष्ण हरी /
नाना सोंगे रचतो मी /देवा एक तुझ्यापायी /
किती बाहेर मी धावू /मन आत हे ओढ़ते /
सत्यस्वरूपी वळते /बाकी काही न कळते /
अजब ही तुझी त-हा /फिरवीशी गरागरा /
आता आली मज घेरी /म्हण राम कृष्ण हरी /

तृणीकृत्य जगत्सर्वं राजते सकलोपरि /
चिदानन्दमयं शुद्धं हरेर्नामैव केवलम् /

शनिवार, २७ जून, २००९

माझा भारत देश


पैलथडीचा सूर लागतो

पाय थबकती येथे


ऐलपैल मग काहीच नुरते


धरती अंबर होते






सांगणेच उरले इतुके


मी माझा उरलो नाही


पाऊलखुणा ना माझ्या


दिंडी ही चालली आहे






तर्काचे तुटती तारे


आपुलकी बळकट धागे


अल्ला हा ईश्वर आहे


कान्हा येशुला सांगे






या भेटीगाठी आपुल्या


केवळ ना योगायोग


हा देश गड्यांनो आपुला


वाहता स्मृतींचा ओघ






आहेत पुण्यभूमीत


मशिदी चर्च मंदिरे


सा-याच घरांचे रस्ते


चौकात इथे मिळणारे






सत्याला पडतो प्रश्न


हे स्वप्न आहे का सारे


दुनियेत कुठे ना मिळतो


हा भारत देश जपा रे


शनिवार, ६ जून, २००९

Shri Shirdi Saibaba Samaadhi darshan


Shri Shirdi Saibaba may bless us.
जोडूनिया कर चरणी ठेविला माथा/
परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा////
असो नसो भाव आलो तुझिया ठाया/
कृपादृष्टी पाहे मजकडे सद्गुरुराया////
अखंडित असावे ऐसे वाटते पायी/
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई////
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी/
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी////

शुक्रवार, ८ मे, २००९

पुनव

//दुरिताचे तिमिर जावो /विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //


उजळल्या पुनवेचा
यावा प्रकाश घरात
डोळ्यातील काळोखाचा
न्हावा कोपरा दुधात

चंद्रबिंब साजरे हे
आसासून किती पाहू
अवसेच्या जिंदगीला
विसरून आता जाऊ

असा योग चांदण्याचा
पुन्हा पुन्हा येत राहो
काळोखाची जडमिठी
जरा सैल करा हो

धरु आशेचा किरण
जाऊ रातीच्या पल्याड
उजाडल्या नजरेने
खोलू सुर्याला कवाड

शनिवार, २ मे, २००९

आनंद





//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //



मन कोरी पाटी मन लख्ख आभाळ

मनाचे शुद्ध व शांत स्वरूप इतके आनंदमय असते की शब्दात वर्णन करता येत नाही.आनंदाचा वारा झुळकत असतो, आनंदाचे किरण चमकत असतात, आनंदाचा पाऊस बरसत असतो, आनंद पानापानात डोलत असतो, आनंद दगड बनुन थबकलेला असतो ;आणि हे सारे अकारण, निर्हेतुक, फक्त स्वत:साठी ! हे कुणाला सांगायचे नसते तरीही पक्षी गात असतात, कुणाला काही द्यायचे नसते तरीही झरे खळखळत असतात ! नक्षत्रे फुलत असतात आणि फुले उमलत असतात.आपण स्वत:ही अकारण, निर्हेतुक, पूर्णानंदस्वरूप असतो जेव्हा मन अविचलित असते.

रविवार, १५ मार्च, २००९

ज्ञान

//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //


समजाविणे अंतासी गेले
शब्दांचे पांग फिटले
मन बुडी देऊन बसले
अर्थाच्या तळासी

ऐकणे आतून होई
नाद ॐकाराचा येई
पाहणे लयास जाई
चिदाकाशी

मुखा गोड मौन पडले
ह्रदयी प्रेम उचंबळले
आत्मविश्रांतीसी आले
स्वानंदफळ

देहबुद्धी स्वये विरे
आपपरभाव नुरे
विराटाची मुद्रा मुरे
एकत्वात

शनिवार, १४ मार्च, २००९

कल्लोळ

//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //


विठू माउलिये आलो काकुळती
घेई घेई पोटी झणी मज
तुजविण मज नाही कुणी त्राता
टेकवितो माथा तुझे पायी

तुज राम म्हणुनी गाऊ
महादेव म्हणू शिरावर घेऊ
की तुजपायी विट होऊ
कळेना मज सर्वथा

विषयाचे सुख नको म्हणताना
विषय तू कृष्णा झाला रसे
सृष्टीच्या पानोपानी राम कृष्ण वसे
दूर जाऊ कसे तुजपासुनी

गाढा तुझा लळा मजसी लागला
प्रगट तू झाला सगळीकडे
दर्शन तू देता उल्हास वाटला
प्रकाश दाटला नभांगणी

भूत भविष्य वर्तमान
आनंद कल्लोळ जीवन
अमृतमय राम कृष्ण
सर्वांठायी अखंड एकरस

शनिवार, २१ फेब्रुवारी, २००९

विनित

//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //


इतनी तो जगह दे दाता
चरणोंमें तेरे आऊं
यही वजह जीनेकी पाकर
धन्य धन्य हो जाऊं

तुझबिन तो सब रंग है फीके
दुनिया मेरी अधूरी
क्या करना ,क्या पाना ,
कर दे कमी मेरी सब पूरी

तेरे साथ है जीना
वरना ख़ाक है काया मेरी
तू है आत्मसम्मान सभीका
चाहत सबको प्यारी

ना जाने क्यूँ दुनिया मुझको
बार बार ठुकराए
तेरी कृपाही मुझको अपनीओर
खींचती लाये

लोगोंको कैसे समझाऊं
तूही है कर्ता,भर्ता
अहंकार इनका मैं तोडूं
कैसे बता दे दाता

दया ,क्षमा ,शान्तिका धर्म
ना जाने है कोई
विनित भाव दुनियाको जीते
तुही बता दे सांई


शनिवार, २४ जानेवारी, २००९

गाणे


प्रजासत्ताक दिन शुभेच्छा
//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //

या गाण्याच्या लकेरीला
फार जुना इतिहास आहे
गाण्यात खोल मुरलेला
या मातीचा श्वास आहे

याने पांगळे होणे नाही
छातीत या विश्वास आहे
आपुलकीचा गंध याला
प्रेमाचा सुवास आहे

जगभर जाईल वारे
सामावून घेईल सारे
दुजेपणाचे बंड मोडून
टाकण्याचा सोस आहे

दहशतीचे वार याला
दुबळे करू शकत नाही
आक्रमणाचे डाव याला
बांधून ठेऊ शकत नाही

या गाण्याच्या अक्षरात
देवाचा निवास आहे
मी नाही सांगत बाबा
सांगतो कबीर व्यास आहे


माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.