गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

अमरत्व



येणे जाणे आभास
नित्यता अबाधित आहे
मारणार कोण कुणाला
थांबेल फक्त हा श्वास

शुन्यातुन कोण आले का
शुन्यात कोण मिळणार
आस्तित्व सदोदित आहे
करू नको शोक हा फुका

हा खेळ युगानुयुगांचा
हे व्यक्त मिळे अव्यक्ता
बदलते दशा ही फक्त
फरक हा रंगरुपाचा

येईल पुन्हा जन्माला
अव्यक्तच रंगरुपाला
हे चक्र जगाचे चाले
पडणार खंड ना याला

जाणीव ही नित्यत्वाची
होणेच पुरेसे आहे
मग शोक दु:ख तक्रार
नाही उरणार कशाची

धर्मक्षेत्र




हे शत्रुसैन्य जमलेले
केवळ पेंढा भरलेले
संकल्प आहे हा माझा
यश तुझे आहे ठरलेले

उन्मत्त माजलेल्यांना
करूणा नाही कामाची
मी तुझा सारथी झालो
मारून टाक तू यांना

हे अधम पातकी वीर
झालेत भूमीला भार
अवतरलो आपण आता
धर्माला सावरणार

कर्माची खंत कशाला
पूर्णकाम मी असुनीही
उतरलो रणात सदेह
झुंजणे खेळ हा आपुला

करणारा मी हे जाण
तू निमित्त हो मरणाला
साम्राज्य पाहते वाट
हे नव्हे युद्ध हे पुण्य

बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

सुखकर्ता बाप्पा आला



नामघोष
दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

गुलाल माखला
घोळका नाचला
ताशा तडाडला
ढोल दणाणला

नामघोष दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

गणेश सजला
रथात बसला
मंडपी आणला
सण सुरु झाला

नामघोष दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

पूजा आरतीला
मोदक खायला
भक्त आनंदला
चौक उजळला

नामघोष दुमदुमला
सुखकर्ता बाप्पा आला

ॐ गं गणपतये नम:

शनिवार, २२ ऑगस्ट, २००९

देव

सकळां अंतरी /उपजे जिव्हाळा /
अंकुर कोवळा /तोचि देव //१//

विंझणवारा जो /जिवाला ओलावा /
सावली गारवा /तोचि देव //२//

भाकरीचा घास /दुस-यास देतो /
संतुष्ट जो होतो /तोचि देव //३//

मायेची ममता /पाठीवर हात /
गोड जो बोलत /तोचि देव //४//

ज्याच्याकडे नाही /हाव मोठेपण /
होतो जो लहान /तोचि देव //५//

विनातक्रार जो /दु:ख पचवितो /
मदत करतो /तोचि देव //६//

सदा समाधानी /नाही अभिमानी /
सहज जो ज्ञानी /तोचि देव //७//

मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

सवाल

श्रद्घा................................................सबुरी
त्रिविध
या तापांनी
आटत जे नाही
दुनियेच्या प्रेमाला
काय म्हणावे

दु:ख एकट्याचे
सोसले असते
यांच्या कळवळ्याला
काय करावे

नाही बोलणार
ठरवले होते
फुटलेल्या बांधाला
कसे रोखावे

देवा तुझ्यापुढे
मी नाही एकटा
जन समाजाला
काय सांगावे

सवाल पुष्कळ
सोडव झडकरी
असे तुला तरी
कसे म्हणावे

शनिवार, १५ ऑगस्ट, २००९

वादा

//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //


का रे पांडुरंगा /भाव खातो जादा /
तोडतोस वादा /भेटेना तू //१//

आमच्या अश्रुंची /तुज ना किंमत /
बैस पिंज-यात /बडव्यांच्या //२//

जग व्यापणा-या /तुझी सोवळ्यात /
शुद्धी करतात /थट्टा तुझी //३//

महिषासारखे /वेद रेकतात /
अर्थाची ते खंत /करिनात //४//

मनामधे भाव /जळाची ओंजळ /
पान फूल फळ /तुला पुरे //५//

हमेशा आमच्या /असतो सन्निध /
त्यांनासुद्धा बोध /होऊ दे ना //६//

सर्वांघटी शुद्ध /समान श्रीहरी /
नांदे चराचरी /नारायण //७//

ॐजय जय राम कृष्ण हरीॐ

शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

Man Tarpat Hari Darsan ko Aaj

This is a very special song in the history of Indian cinema changing the taste of people from western style to the Indian classical and devotional blend. Thanks to the trio {Shakeel Badayuni, Naushad and Mohammed Rafi}.

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.