सर्वांचा मी आहे
सर्व आहे माझे
गणगोत माझे
विश्व सारे
मीच भरलेलो
त्रिखंड पृथ्वीत
कोंदलो विश्वात
अवघा मी
माझे नाही असे
काय या जगात
उणे ना कशात
मज काही
डोंगरापरीस
मोठे माझे सुख
तिळभर दु:ख
नाही मज
कमतरता ती
स्वये गेली वाया
कृपा विठू राया
तुझी झाली
सर्वांचे सगळे
होऊन बसलो
ब्रह्मानंदी न्हालो
याचि देही
सर्व आहे माझे
गणगोत माझे
विश्व सारे
मीच भरलेलो
त्रिखंड पृथ्वीत
कोंदलो विश्वात
अवघा मी
माझे नाही असे
काय या जगात
उणे ना कशात
मज काही
डोंगरापरीस
मोठे माझे सुख
तिळभर दु:ख
नाही मज
कमतरता ती
स्वये गेली वाया
कृपा विठू राया
तुझी झाली
सर्वांचे सगळे
होऊन बसलो
ब्रह्मानंदी न्हालो
याचि देही
ॐ
हे विश्वचि माझे घर
ऐसी मति जयाची स्थिर
किंबहुना चराचर
आपण जाहला
ॐ
ॐ