शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

ज्ञानोत्तर भक्ति





माझे असे भक्त , ज्याना आत्मज्ञान झालेले आहे व ज्याना काहीही 

कर्तव्य शिल्लक राहीलेले नाही 

तरीही जे सतत माझे गुणगान व नामसंकिर्तन करतात , ते मला 

अतिशय प्रिय आहेत

राम कृष्ण हरी गोविंद

माझिया नामाचे निखळ प्रबंध

माजी आत्मचर्चा विशद

आणि श्रवण करीती जे

_ज्ञानेश्वरी


भक्त प्रह्लाद हा अशा भक्तीचे उत्तम उदाहरण आहे , त्याला पक्के 

माहीत होते कि नारायण सर्वव्यापि 

आहे , खरे तर तो स्वत: सुद्धा नारायणच आहे तरीही तो 

भगवद्किर्तन करायचा

विष्णुमय जग

वैष्णवांचा धर्म

भेदाभेद भ्रम

अमंगळ

_गाथा

अशा प्रकारच्या भक्तिमुळे आत्मशांति मिळते

मनावर , तनावर , चित्तावर सुखाची साय चढते

मी ज्या प्रकारच्या आरामाची गोष्ट करतो तो अशा प्रकारचा 

आत्म्याचा , चित्ताचा , मनाचा आराम 

आहे , देहाचा नव्हे

असे लोक आपापले नेमलेले काम अतिशय शांतपणे , स्वस्थ 

चित्तान

करतात , त्यांच्या मनात 


कसलेही व्यर्थ संकल्प , विकल्प येत नाहीत


शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

कर्मयोग



ॐ 

केशवा मला काम दे
अहंकार देऊ नको 
सुख दु:ख दे हवे तर 
क्षिती त्याची देऊ नको 

माधवा मला काम दे 
फळाची अपेक्षा नको 
मान अपमान दे हवे तर 
खेद खंत देऊ नको 

आरंभिले सिद्धीस जावे 
अथवा अधुरेच रहावे 
यश अपयश मर्जी तुझी 
लिप्त मन देऊ नको 

जीव ओतून काम करावे 
जशी काही लालूच असावी 
खेळ पूर्ण झाल्यावर मात्र 
त्यात रस देऊ नको 

झाले गेले विसरून जावे 
त्रयस्थाप्रमाणे सारे पहावे 
पवित्र कर्मयज्ञ करावे 
व्यथा चिंता नको नको 

ॐ कृष्णार्पण ॐ 


सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

अलिप्त



महाशून्याच्या घरी 
आनंद आहे दाटला 
शांततेच्या उंब-यावर 
अहं भिरकाउन दिला 

मुक्त आहे मुक्त आहे 
भाव हा कोंदाटला 
मूक झाले शब्द अन् 
संवाद आहे संपला 

मी कुणाला काय सांगू 
नाही सामोरे कुणी 
सर्व काही मीच आहे 
काही इच्छा ना मनी 

जाहलो मी पूर्णकाम 
संपला व्यवहारही 
सवे गेले ज्ञानाज्ञान 
जिंकिले कैवल्यही 

कर्म हे नैष्कर्म्य झाले 
सोडणे काही न उरले 
जाहलो अलिप्त मी अन् 
साम्य द्वंद्वी पाहिले 

ॐ 

रविवार, २४ जुलै, २०१६

स्वानंद



स्वानंद सुखे मी मातलो मातलो

आनंदीत झालो तुझ्या नामे


दुमदुमे देह तुझ्या नामघोषे

उभे तुझ्या वेषे परब्रह्म


भेटीचा सोहळा काय मी वर्णावा

मिळाला विसावा तव पदी


पखवाज वीणा मृदुंग व टाळ

गातात गोपाळ अतिसुखे


उठले रोमांच सुखावली काया

धुंद आत्मराया नाचतोय


मंगळवार, २१ जून, २०१६

शुक



इंद्रिये गोविती
दु:स्वप्न निद्रेत 
सत्यात जागृत 
होऊ नेदी 

व्यापक असुनी 
होई बंदिवान 
आत्म्याला लहान 
तनु मानी  

शुकाने नलिका 
धरलेली स्वये 
म्हणे मी गे माये 
बांधलेलो 

शरीरापुरता 
नाही तू मनुजा 
तू रे आत्मराजा 
सर्वव्यापी 

जन्म नि मरण 
हे नोहे तुजला 
अनित्य भासला 
देह खोटा 

सत्य स्वरूपाचे 
ज्ञान घे तू वत्सा 
होऊ नको पिसा 
परमात्म्या 

अगाध अपार 
सर्वत्र शाश्वत 
तू अपरिमित 
परमेश 



शनिवार, २८ मे, २०१६

एकायतन



मी आत्मस्वरूप 
पाहतो सर्वात 
राहतो निवांत 
आत्मानंदी 

एक मीच आहे 
सकळ जगात 
वर्ततो सर्वात 
एकटा मी 

उच्च नीच काही 
भेद ना उरला 
अवघाच झाला 
सदानंद 

ईश्वरे व्यापिली 
ब्रह्मांडे समग्र 
सारे अमुलाग्र 
आत्मतत्व 

आत्मा परमात्मा 
हे एकायतन 
कसे मी भजन 
करू देवा 

अहंकार गेला 
नाहीसा होऊन 
झालो आता लीन 
सर्वांपायी 

ॐ 

बुधवार, १६ मार्च, २०१६

उद्धार



वासना कर्दमी 
बुडालो ईश्वरा
देई ना रे थारा 
चरणांसी  

विषय पंकात 
रुतून बसलो 
नाम विसरलो 
तुझे देवा 

अगा पांडुरंगा 
करी रे उद्धार 
नीच मी पामर 
शक्तिहीन 

घेई गा जवळी 
मला दुबळ्याला 
सोडवी रे मला 
भवातुनी 

पतितपावना 
भक्तीचे दे दान 
तुझे मी चरण 
संवाहीन 

ॐ 

शनिवार, ५ मार्च, २०१६

तूच माझे सारे





तूच माझे सारे

बंधु कुळ गोत


                          तूच सखा आप्त


स्वामी माझा



सख्या पांडुरंगा

अल्ला तूच माझा

गॉड तूच माझा

बुद्ध तूच


तारकांचे नभ

सुमनाांची बाग

बर्फ आणि आग

तूच आहे


सुंदर भेसुर

द्वंद्वाच्या अतीत

काय तुझी मात

सांगू देवा


सारे काही तूच

देवा विठूराया

धन्य माझी काया

वससी तू


सारे चराचर

तूच आहे देवा

विठ्ठला केशवा

नारायणा


सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

दुष्काळ



दुष्काळाने बोध दिला तुकोबांना
हाल अपेष्टांना अंत नाही

कष्ट ते सोसले सख्या ज्ञानोबांनी 
झळाळे ज्वाळांनी खरे सोने 

शेतकरी दोस्ता नको आत्महत्या 
जाणून घे सत्या देव तुझा

विवेकाला नको देऊस तू फाटा 
भोग तुझा वाटा प्रारब्धाचा 

कर्मभोग कोणा चुकतोय का रे 
भोगतात सारे संतजन 

नाव घे देवाचे जाशील तू पार 
देवाने करार केला आहे 

पिलांना सांभाळी मांजरीचे दात 
नाही हो लागत बाळकांसी 

जीवनाची नौका नावाडी ईश्वर 
सुखाने सागर पार कर 

*****

नको खेद करू कोणत्या गोष्टीचा 
पती लक्ष्मीचा जाणतसे 

सकळ जीवांचा करीतो सांभाळ 
तुज मोकलील ऐसे नाही 

आवडीने भावे हरिनाम घेसी 
तुझी चिंता त्यासी सर्व आहे 

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे 
कौतुक तू पाहे संचिताचे 

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा 
हरिकृपे त्याचा नाश झाला 

ॐ 

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

नाम



माणूस म्हणून खरे तर 
जगणे अवघड आहे देवा 
मागणे तुला एकच आहे 
तुझ्या भक्तीचा दे ठेवा 

तुझी भक्ती दे गोविंदा 
दुजे काही नको मज 
अशाश्वत जीवनात 
नश्वराचे काय काज 

तुझे नाम ओठी यावे 
मन शांत शांत व्हावे 
हेच वरदान द्यावे 
अन्य काय मी मागावे 

ॐ 

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.