शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

मामा



मुलांनो, तुम्हां प्रत्येकाची आई ही माझी बहिण आहे.तुम्ही सारे माझे भाचे आहात.तुमच्या बायका या माझ्या मुली आहेत.परंतु तुम्ही फार रागीट आहात.मी तुम्हाला काही दिले तर तुम्ही मला म्हणता "आम्हाला काही नको,द्या तुमच्या मुलाला." म्हणून मी हे जाहिर करतो की तुम्ही मला माझ्या स्वत:च्या मुला पेक्षाही जास्त प्रिय आहात.तुमची आई तुमच्यावर जेवढे प्रेम करते तेवढेच प्रेम हा तिचा भाऊही तुम्हांवर करतो.कारण त्या माउलीचे मातृ ह्रदय माझ्यातही आहे.या मामाचे एवढेच सांगणे आहे की आपसांत प्रेमाने रहा.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:
सद्गुरु माझा सखा
भगिनी बंधू चुलता
मामा माता पिता
सर्वस्व माझे

रविवार, २६ डिसेंबर, २०१०

वर्तमान स्थिती


आर्थिक गुन्ह्यांत तसेच स्त्रियांविरोधी गुन्ह्यांत ठळक वाढ झालेली आहे. पर्यटनास चालना देताना गुन्हेगारीस आळा बसेल हेही आपण पाहिले पाहिजे.यासाठी प्रभावी आध्य्यात्मिक नेतृत्वाची गरज आहे.अन्यथा चंगळवाद फोफावेल व गुन्हेगारी मानसिकता वाढेल.सर्वच बाबतीत संयम हा व्यक्तिगत व सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक असतो.आपणास परमेश्वरकृपेने जे काही मिळते ते इतरांना निरपेक्ष बुद्धीने थोडेफार देण्यामुळे आपले व समाजाचे आध्यात्मिक हित होते.
एकंदरीत संयम आणि दान या दोन गोष्टी सध्याच्या परिस्थितीत फार महत्वाच्या आहेत.

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

Charta Sooraj ( Original n Full ) -Great Qwwali by Aziz Naza



Click on the above title and get sweet names of Allah. All of these names are applicable to God or Bhagavan Parabrhma { Shiva or Narayana } as well.
God is one.
Only discipline { karmakanda } differs, all of us worship the same God.We are one.
This song gives precious guideline for all of us.
The essence of this song is that we should not concentrate our attention on the material aspect of the world; instead of it, worship of the God is our prime necessity of life.
Merry Christmas
Happy New Year

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

कर्तव्यपालन



रामा कळकळुनी
करी मी विनवणी
बैस बा सिंहासनी
अयोध्येच्या

कोंडीले मी प्राण
पहावया क्षण
तुझे पदार्पण
वांछितो मी

तुझ्या प्रजाजना
सांगे वानरसेना
आला आला राणा
अयोध्येचा

देवा तुझ्या पाया
अंथरली काया
कृपा करी राया
रामचंद्रा

निजकर्तव्याला
कसा विसरला
प्रजापालनाला
चुकू नको

तुझ्या प्रेमाकरीता
व्याकुळली जनता
प्रतिसाद आता
देई रामा

रविवार, ७ नोव्हेंबर, २०१०

वनवास




पहा दशरथाला आज पुत्रशोक झाला
सोडुनी अयोध्या माझा बाळ हा निघाला

हाय आज वनवासाला राम हा निघाला
देह त्यागुनी हो माझा प्राण हा निघाला

कोवळा कुमार सुंदर चालला वनाला 

अयोध्या अनाथ करुनी नाथ हा निघाला 

थांबवू कसा मी याला कुणी काही बोला
अभागी पिता मी याचा कसा अडवू याला

दैव दुष्ट माझे सारा उपाय खुंटला

जानकी व लक्ष्मणासवे राम हा निघाला

प्रेमपाश माझे सारे तोडुनी निघाला
तीर धनुष्याला जणू हा सोडुनी निघाला

पुत्र करी आज पित्याच्या वचनपालनाला
शोकसंकटात अयोध्या टाकुनी निघाला

।। हरे राम ।।

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

मातीमोल




किती
युगांचा अंधार
उरी साचत राहतो
जेव्हा तुझी भेट देवा
मला कुणी नाकारतो

देवा किती युगे गेली
किती धर्म बदलले
जुने मोडून काढले
नवे अवतार घेतले

किती नामे बदलली
किती रुपे मी घेतली
तुझ्या प्रेमासाठी देवा
सोंगे किती सजवली

वैकुंठाला सोडून मी
किती वेळा रे यायचे
तुझ्या चैतन्या ऐवजी
पाषाण हे कवळायाचे

कशा बेड्या तुझ्या तोडू
कशी दारे ही उघडू
उभ्या भेदाच्या या भिंती
काय करून मी पाडू

देवा थकलो थकलो
देवा हरलो हरलो
इथे मातीमोल झालो
तुला सोडून मी आलो

असा किती वेळा रामा
जाशील तू शरयुमधे
जगी लांडीलबाडीच्या
भक्ति जाते भुमीमधे

देवा तुझे माझे प्रेम
कसे यांना कळायचे
यांनी काढले विक्रीला
माणुसपणसुद्धा यांचे



बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

दिवाळीचा फराळ




नको जाऊ कोमेजुन
दोन घास घे खाऊन
ताट भरून पक्वान्न
आला खडाही चुकून
त्याला बाजुला सारून
घ्यावे गोड तू करून
देवा आणले रांधून
कसेबसे मी कष्टानं
नाही दिसत डोळ्यानं
परि भाव घे जाणून
रामा तुझ्याच सुखानं
तृप्त होई माझे मन
तुझ्या डोळ्यांच्या ज्योतीनं
जग जाते उजळून
जातो प्रकाश भरून
सा-या कोनाकोप-यानं
तुझ्या दिवाळी सणानं
फुले लख्ख तारांगण


।। राम कृष्ण हरि ।।





बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

विनंती



व्याकुळलो
तुझ्या गोड शब्दासाठी
भूक जगजेठी भागवेना

स्नेहाविना तुझ्या व्यर्थ ही चाकरी
कोरडी भाकरी गिळवेना

जड झाला जीव तुझ्याविना रामा
काय येई कामा पैसा तुझा

आसतुटी मज केलेस तू रामा
देवा तुझ्या प्रेमा आसुसलो

दर्शनासी द्यावे उदार होउन
उगा कोते मन करू नये

नको सायुज्यता नको सरूपता
दे गा समीपता दयाघना

दास्य सख्य भक्ति दे रे रामराजा
विरहाची सजा नको नको

चुकता मी मंद तुही क्रोध कर
परि असा दूर लोटू नको

क्षमेच्या समुद्रा येत जा भेटीला
रे माझ्या जिवाला चैन नाही


।। राम कृष्ण हरि ।।



रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

साईबाबा






चला शिर्डीकडे जाऊ

डोळे भरूनिया पाहू साईदेवा

करी नाश जो दु:खाचा
घेऊ आशिर्वाद त्याचा सारेजण

करी संसार सुखाचा
देई वसा जो श्रद्धेचा सबुरीचा

बसुनिया सिंहासनी
करी राज्य जनामनी साईबाबा

आहे सकळ धर्मांचा
सारा गोतावळा याचा दुनियेत

बाबा म्हणे याहो याहो
माझी उदी भेट घ्याहो भक्तजन


सोमवार, १३ सप्टेंबर, २०१०

छंदीफंदी






सगुण
रुसता निर्गुणासी जातो
जाता पस्तावतो दोन्हीकडे

देव न भेटता दु:ख मज देतो
भेटता करतो हाल माझे

देवा येरझारा उगा मी घालतो
त्रास हा सोसतो तुझ्यापायी

काय उणे दुणे तुझे मी काढले
ऋण का घेतले तुझे कधी

तुझिया नामाचा छंद हा वाईट
कुणी या फंदात पडू नये


राम कृष्ण हरी

रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

माय माउली






माजला कुतर्कांचा महापूर भूमीवरी
शांतवी या असुरांना माये करी शस्त्र धरी

कडकडू दे लखलखते ज्ञानाचे अस्त्र करी
जड़ बुद्धि सूक्ष्म करी भक्तांचे दुरित हरि

खुतला हा महिष जणू दुर्बुद्धि साचली ही
खळखळू दे ज्ञानाच्या गंगेला घरोघरी

कर्मकांड पाखंडी शब्दांचा कीस करी
देवाचे सोंग घेत दैत्य जगी राज्य करी

गे माये हतबल मी थोपव या कुविचारा
देई वसा शौर्याचा आमुचे कल्याण करी





शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०

अलख निरंजन





सर्वात पाहतो आतल्या विठ्ठला
वरच्या देहाला ठकवितो

जीव मज दिसे सर्वात सारखा
आत्माराम सखा चराचरी

सारे मज प्रिय आपल्या समान
महान लहान एक देव

सारी नामे रुपे देवाने व्यापली
भेदभाव ल्याली खोटी दृष्टी

भेटते मजला अतीन्द्रिय सुख
आदेश अलख निरंजनी


सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

दास्यत्व





कष्ट साहतोसी माझ्यासाठी देवा
जिव्हाळा वर्णावा कैसा तुझा

प्रेमभावे माझे दाटले ह्रदय
कोणत्या उपाये व्यक्त करू

तुझ्या कृपाभारे वाकले हे झाड
लेकरांना धाड फळे खाया

मज
रामा तुझे दास्यत्व आदिम
नामाचा उदिम सर्वकाळ

माझ्यापुढे काय मोक्षाचे ते काम
नामाचा डिंडिम वाजवी मी

दुमदुमो माझ्या देहाची ही खोळ
केले हे राउळ तुझ्या नामे

दाही दिशातून तूच मज भेटो
अन्य ना उमटो दृश्य काही

विठोबा तुजला हेच गा मागणे
इतर सुचणे नको मला

राम कृष्णी रत राहो माझे चित्त
दिसो दिनरात तुझे रूप

तुझा दिव्य भाव वसो माझ्या देही
नसे अन्य काही आस माझी

रामा हरि कृष्णा विठो नारायणा
पुरवी वासना जन्मोजन्मी

वाजो टाळघोळ मृदुंग कल्लोळ
गळा तुळशीमाळ हिंदोळावी

डोलो माझे पाय नामाच्या गजरी
राहो खांद्यावरी झेंडा तुझा





गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

दास




तुजविण रामा । क्षण कंठवेना ।
तुज जाणवेना । व्यथा माझी ।।


जिवलग सखा । तुजऐसा नाही ।
कृपादृष्टि पाही । मज देवा ।।


एकला मी मृग । जग व्याध झाले ।
मरण लागले । पाठी माझ्या ।।


सांगतो निक्षून । अखेरचे तुला ।
सोडून तू मला । जाऊ नको ।।


जसा
आहे तसा तुझा आहे देवा
गोड हा करावा मूढ़ बोल ।।


भले बुरे काही जाणत मी नाही
तोंडाला जे येई बरळतो ।।


मज दिले बळ त्याने मी फुगतो
वल्गना करतो अभिमाने ।।


रामा राहशील सोडून मजला
कसा मी एकला। जगणार ।।


मज घे जवळ आपला जाणून
दास आहे दीन देवा तुझा ।।


आस आहे एक तुझ्या आनंदाची
माझ्या जीवनाची सार्थकता ।।





मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

विदेही






हे परमेश्वरा,
मी जेव्हा शहरापासून दूर,
माळरानावर पहुडलेलो असतो
तेव्हा इतर माणसांचा,
कुठल्याही कर्माचा
किंवा वासनेचा, अतृप्तिचा,
सुखदु:खाचा, क्रोधाचा,
कसलाही संस्कार नसतो.
मन स्फटीकासारखे शुद्ध,
नितळ स्वच्छ असते
कशाचीही गरज नसते
व काही नकोसे झाले
असेही नसते.
मी माझ्या शुद्ध स्वरूपात असतो.
दुरवर उघड्या बोडक्या
माळरानाशिवाय
काहीही नसते ;
आभाळभर तू असतोस
व परमेश्वरा,
तुझ्या भव्यतेची
एकच जाणीव
मनात उतरत असते.
देवा, तेव्हा तुझी माझी
तार जुळते
व सुंदर संगीत सुरु होते
मला पुन्हा माणसात जाणे
नको असते तरीही
कधीतरी देहभावावर यावे लागते
व या दीन दुनियेच्या
हीन लढाईत
सामिल व्हावे लागते.



दिगम्बराय विद्महे
अवधुताय धीमहि
तन्नो दत्त: प्रचोदयात

शुक्रवार, ३० जुलै, २०१०

वरदान



काय हे गोविंदा
वैकुंठनायका
वरदान देतो
पुन्हा माघारीही घेतो

तुझ्यासाठी जीव माझा
अटीतटी येतो
मोक्षालाही सोडून
मी पुन्हा जन्म घेतो

पुन्हा जातेवेळी
तूच माझ्यापुढे येतो
तुझ्याच भोवती
माझा जीव गोळा होतो

शतजन्म माझे
तुझ्यावर ओवाळतो
मुक्तीचे ते काय मोल
भक्ति मी मागतो

देवा तुझ्या संगतीत
कृतार्थ मी होतो
तुझे गीत गातो
आणि तुलाच पहातो

शनिवार, २४ जुलै, २०१०

मीलन



आपुला उदय अस्तु
कदा न जाणे चंडांशु
टळटळीत प्रकाशु
उरला आता

अंशत्वासी विसरला
तेणे समुद्र प्राशिला
तो जळपणे उरला
स्वरुपानंदी

शिष्यत्व गुरुतत्वात
समरसे नुरे द्वैत
अवघे परमात्म्यात
विलीन झाले

कोणी कोणा काय देणे
कोणी कोठे केव्हा जाणे
समाधिसुखे बैसणे
मोक्षाच्या ठायी

जे बुद्धि बोध बापुडे
प्रपंचात दुरावले
सद्गुरुकृपे भेटले
कैवल्यग्रामी

मंगळवार, २० जुलै, २०१०

ठेवा



कधी धर्म कधी भाषा
कधी जात कधी पेशा
किती बहाण्यांनी
माणूस फाड़ता
ज़रा तरी लाज
बाळगा हो आता
पुरे झाले पाप
दुही पेरण्याचे
जोड़ा काळजांना
दुवे भावनांचे
एकीचा दीपक
पेटवाल कधी
दु:खाचा काळोख
विझवाल कधी
तुमच्या दारात
रोज उगवतो
द्यायला मी दान
स्वत:हून येतो
फाटका पदर
तुमचा हा शिवा
प्रकाशाचे दान
स्वीकारा हा ठेवा

समर्थ



सुखी रहा बाळांनो
एवढे आहे मागत
तुम्हाला सोडून नाही
मजला सुख अन्य कशात

आहे माझ्या पदराला
बळ आभाळाच्या इतके
आभाळ ठेंगणे होते
जेव्हा तुम्हांस पहाते

मी वा-याशी भांडते
तुमचा कैवार मी घेते
मागणे तुम्हाला इतके
की रहा खेळते हसते

मी पहाडसुद्धा होते
संकटास मी थोपविते
मी लोळ विजेचा होते
दु:खावरती कोसळते

भिऊ नका आहे पाठीशी
मी समर्थ आहे आई
तत्पर तुमच्या हाकेला
मी सदा धावुनी येते

मी सर्वांची माउली
सांगते तुम्हा सर्वांना
उतमात करू नका कधी
मी सुख सगळ्यांना देते

प्रेम



तुज प्रार्थितो मी सद्गुरु अवधारी
नेई सुपंथे भवपैलतीरी
अज्ञानी बाळास काही कळेना
परि माउली तू विसरु नको ना

तुजविन मज कोणी नाही कृपाळा
धरी राग कैसा आपुल्याच बाळा
अपराध माझा जरी काही झाला
क्षमा करुनी पोटात घाला

चुकतो पुन्हा मी मज बुद्धि नाही
मज सावरुनी तू जवळी घेई
रे मी भुकेला मज ज्ञान देई
ते प्रेम पिउनी मी धन्य होई

माझा राम




माझा राम माझा राम
राम जगतजीवन
माझा राम माझा राम
राम पतितपावन

माझ्या रामा तुझा छंद
तुझे मला वेड जड़े
फुटे उरात पाझर
येरे येरे माझ्याकडे

मला सोडून कधीही
जाऊ नको माझ्या रामा
माझा जीव टांगणीला
लागे तुझ्याविना रामा

माझ्या रामा तुझे रूप
घ्यावे डोळ्यात भरून
काय करावे मावेना
राही नजर ठरुन

माझ्या रामा माझ्या रामा
तूच माझे पंचप्राण
माझ्या काळीज कुपीत
रहा सदैव दडून

ॐ राम कृष्ण हरि ॐ



रविवार, २७ जून, २०१०

"Tu Pyar Ka Saagar Hai" - Hindi Bhazan

गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्याहि शांकरी
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम्

रविवार, २० जून, २०१०

Ghanu waje - Sant Dnyaneshwar abhang - Lata Mangeshkar






अहं निर्विकल्पो निराकाररूपो ।
विभुर्व्याप्य
सर्वत्र सर्वेंद्रियाणाम् ।सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्ध:
चिदानंदरूप:
शिवोऽहम् शिवोऽहम्

ॐ परिसोनी परिसावे ॐ
माझ्याकडे सर्व सुखसाधने उपलब्ध असुनही
परमेश्वरप्राप्ति वाचून ती सर्व मला निरुपयोगी आहेत

ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाली असुनही
तिची सागरालाच मिळण्याची उत्कंठा सततच तीव्र राहते

किंवा एखाद्याला जीवन मिळाले असुनही
त्याची जीवनाबद्दलची उत्कंठा सततच तीव्र राहते ,
जिवंत राहण्याची आसक्ती मरत नाही

त्याचप्रमाणे मला परमेश्वरप्राप्ति होउनसुद्धा
माझी परमेश्वरप्राप्तिची उत्कंठा अजुनही तीव्र आहे

खरे पाहता त्या परमेश्वराने
मला अशा अवस्थेत पोहोचविले आहे
कि मला सर्वत्र तो एक परमेश्वरच दिसतो


इतकेच काय मला स्वत:ऐवजी
आरशात सुद्धा तो परमेश्वरच दिसतो

माझ्या परमेश्वर स्वरुपाचे ज्ञान मला आहे

ही त्या भवतारक , देवकीनंदन ,रुक्मिणीपति ,
परमपिता श्रीकृष्णाची कृपा आहे

सोमवार, २४ मे, २०१०

होडी



तुज आळविता / तुझे गुण गाता /
मोक्षाच्याही माथा / पाय ठेऊ //१//

कृपाळु राघवा / प्रेमाच्या अर्णवा /
सेवकाच्या जीवा / परब्रह्मा //२//

गोड तुझे नाम / गोड तुझे रूप /
स्नेहाचा तू दीप / दीपगृही //३//

इंद्रिये करती / कामे ठरलेली /
अंतरी मुरली / वाजतसे //४//

भवाच्या सागरी / तू माझा नावाडी /
तूच माझी होडी / पांडुरंगा //५//

शुक्रवार, २१ मे, २०१०

अकर्ता



कृपा करा जी दातारा
न लागो वासनेचा वारा

माझा देहभाव जावा
तुमचा आठव रहावा

अन्य बन्ध नाही उरले
समचरण हृदयी धरिले

द्यावे मज जगजेठी
फक्त तुमचे नाम ओठी

सूर्य कारक अकर्ता
रश्मि निर्लेप स्पर्शिता

कर्ता कर्म फल तिन्ही
विलीन झाले तुमच्या ध्यानी



ॐ 


रविवार, २ मे, २०१०

कुटुंब


सारे जरी क्षणाचे
नाही कुणी कुणाचे
जपतो अजुनही मी
अवशेष हे घराचे
अजुनही मी तुमचा
तुम्ही जरी विसरला
मी नित्य इथे आहे
पटेल हे तुम्हाला
का शुष्क काळजात
सुकतात प्रेमसुमने
का लाडक्या घरात
दुरावतात ही मने
पोटात काळकूट
ओठात शब्द काटे
नजरेमधे विखार
हे कशासाठी वैर
का पुन्हा गुंतलो मी
का मोह आज झाला
तुमच्याचसाठी आलो
तुमच्यात जीव अडला
माझे तुम्ही असावे
तुम्हात मी हसावे
रानात गोकुळी या
वैकुण्ठ प्रगट व्हावे
वसुधैव कुटुम्बकम

रविवार, २८ मार्च, २०१०

Original Rang De Basanti Chola Song

My humble tribute to


BHAGATSINGH, SUKHADEV and RAJGURU




सभी लोग अपनी गिरेबान साफ़ करे ।

मुझपे उंगलियाँ न उठायें।

सादगीपर अमल करे।

सस्ता खाना खाएं, गोश्त,शराब एवं अय्याशी छोड़ दे।

महिलायें अपने मर्दोंसे गहने आदिकी अपेक्षा न करे।

इन बातोंसे आपकी भ्रष्टाचारसे छुट्टी हो जायेगी।

इससे राष्ट्रकी आध्यात्मिक तरक्की हो जायेगी।

भगवान भला करे।





बुधवार, १० मार्च, २०१०

Payoji Maine Ram Ratan Dhan Payo by Lata Mangeshkar






तरुणौ रुपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।


फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।






vaishnav jan

This is applicable not only to every religion but also to all mankind.listen to this excellent bhajan and experience purification of self.

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१०

हिशोब



विंझणवारा असाच नकळत
यावा दिसत नसावा
तप्त काळजा थंड करील जो
गुलाबजल शिडकावा

गुणगुणणे ओठांवरचे
अंगाई व्हावी कोणा
अन स्पर्शाचा आधार वाटो
भय विसरावे पुन्हा

जन्मभराचा जरी न मक्ता
कुणी कुणाचा घ्यावा
एकवेळचा घास कुणाला
मजला देता यावा

ऐक ईश्वरा मीही हसावे
आणि दुजाही हसावा
मनामनांचा मणभर बोजा
मी हलके उतरावा

अन्य कोणता ध्यास न मजला
स्नेह दुजाला द्यावा
हिशोब माझ्या आयुष्याचा
स्वल्प असावा देवा

उलगडणे कोडे दुनियेचे
आहे सोपे फार
समाधान चावी खाजिन्याची
प्रेम अनंत अपार

Love is God
Love for All




रविवार, ३१ जानेवारी, २०१०

देव












अहं
निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम्
सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्ध:
चिदानंदरूप: शिवोऽहम् शिवोऽहम्





देवत्व भेटले जे
माझ्याच अंतरात
गगनात माईना ते
पसरे दहा दिशात

नाही परीघ ज्याचा
ना एक केंद्रबिंदु
उरला प्रकाश नुसता
सुर्याविना स्वयंभू

ना एक नाही दूजा
कोंदाटला अखंड
ना लाट ना समुद्र
ब्रह्माण्ड होई पिंड

उरली पुढे न भाषा
उरले न कार्य काही
सुखसागरात स्तब्ध
स्वानंद मग्न होई

निधान कुंभ भरला अभंग
पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

भक्त





फार एकटा मी पडलो रे
लपला कुठे ईश्वरा
प्रकाश दिसतो सगळीकडे
का तू लोपला भास्करा

कोण भाकरी देणार मजला
सेवा कुणाची करू
बोलू कुणाशी भांडू कुणाला
गायीविना वासरू

नको मला बा तुझे देवपण
भक्त राहू दे मला
कळणार नाही तुला माधवा
भक्तीची नाही तुला

दिसो मला तू हस-या दयाळा
उर्मी तू मम जीवनाची
तूच मी व्हावे खुळी वासना
दे तव कृपा दर्शनाची

गोविन्दम् गोविन्दम् गोविन्दम्
भज मेरे मना

रविवार, १७ जानेवारी, २०१०

सच्चिदानंद


अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम्
सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्ध:
चिदानंदरूप: शिवोऽहम् शिवोऽहम्




जे म्यां एका सच्चिदानंदावाचून
भजति ग्रह तारे देवता गौण
पिशाचादि क्षुद्र गण
त्याचे कारण अज्ञान

त्या पुजकांसी फळ मिळे जाण
त्यास मीच असे खरे कारण
मीच राहतो सर्व व्यापून
भाव तैसे फळ देतो त्यांना

परि ते फळ असे नाशिवंत
पुढे मृगतृष्णा वाढवित
मज एकावाचून शाश्वत
स्वरुपसमाधान कदा नसे

मज जाणून घेई भक्ता
पहा मजला जगती समस्तां
व्यक्तामध्ये पहा अव्यक्ता
निजानंदी नित्य रहा भला

At the same time I am wave as well as ocean

शनिवार, २ जानेवारी, २०१०

शिवोऽहम्


अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम्
सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्ध:
चिदानंदरूप: शिवोऽहम् शिवोऽहम्



सोऽहं

ओम वाघ्या सोम वाघ्या
प्रेम नगारा वाजे
मल्हारीची वारी माझ्या
मल्हारीची वारी
सावध होउन भजनी लागा
देव करा कैवारी
बोध बुधली ज्ञान दिवटी
उजळा महाद्वारी
आत्मनिवेदन भरित रोडगा
मिळतील हारोहारी
एका जनार्दनी धन्य खंडेराव
देव माझा मल्हारी

येळकोट येळकोट जय मल्हार


माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.