
आपुला उदय अस्तु
कदा न जाणे चंडांशु
टळटळीत प्रकाशु
उरला आता
अंशत्वासी विसरला
तेणे समुद्र प्राशिला
तो जळपणे उरला
स्वरुपानंदी
शिष्यत्व गुरुतत्वात
समरसे नुरे द्वैत
अवघे परमात्म्यात
विलीन झाले
कोणी कोणा काय देणे
कोणी कोठे केव्हा जाणे
समाधिसुखे बैसणे
मोक्षाच्या ठायी
जे बुद्धि बोध बापुडे
प्रपंचात दुरावले
सद्गुरुकृपे भेटले
कैवल्यग्रामी