
कधी धर्म कधी भाषा
कधी जात कधी पेशा
किती बहाण्यांनी
माणूस फाड़ता
ज़रा तरी लाज
बाळगा हो आता
पुरे झाले पाप
दुही पेरण्याचे
जोड़ा काळजांना
दुवे भावनांचे
एकीचा दीपक
पेटवाल कधी
दु:खाचा काळोख
विझवाल कधी
तुमच्या दारात
रोज उगवतो
द्यायला मी दान
स्वत:हून येतो
फाटका पदर
तुमचा हा शिवा
प्रकाशाचे दान
स्वीकारा हा ठेवा