आहे उभा श्रीराम स्वयंभू पाठराखणीला
सांगा भीती असे कोणाला । । धृ । ।
कधी न वावगा शब्द बोललो
वसा टाकुनी कधी न मातलो
वेदवाणीचे तेज असे या प्रखरही बोलाला
सांगा भीती असे कोणाला । । १। ।
घडते जे त्याच्या संकेते
वरकरणी विपरीत वाटते
अधिष्ठान ईश्वरी सकळ या उज्जवल कार्याला
सांगा भीती असे कोणाला । । २। ।
विभुर्व्याप्य श्रीराम प्रगटला
मनोरथावर आरूढ झाला
देह वारु त्याच्या इच्छेने न्यावे तेथे गेला
सांगा भीती असे कोणाला । । ३। ।
आधी सांगितले त्या नुसार
स्वप्नामध्ये येऊनी हरिहर
दृष्टान्ते श्रीरामेश्वर हे कृपावचन बोलला
सांगा भीती असे कोणाला । । ४। ।
ॐ