//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसूर्ये पाहो//
अमर मी आहे /अजन्मा मी आहे /
वेळकाळ आहे /शून्य सदा //१//
इतर कसली /नाही मज क्षिती /
अखंड ही स्थिति /समाधिची //२//
व्यवहारामध्ये /मी नाही गुंतत /
मज हां माहीत /खेळ खोटा //३//
शरीराचा धर्म /शरीरा माहीत /
मी आहे बृहत् /शरीराहून //४//
मान अपमान /दुखणे भागणे /
शरीर हे जाणे /अलिप्त मी //५//
ठायी ठायी मज /देव सापडे रे /
जीवन हे सारे /पूजा झाली //६//
वर रंगरूप /भिन्न जरी दिसे /
आत एकरस /आत्मा नांदे //७//
अकारण आहे /आस्तित्व माझे हे /
स्वानंदात पाहे /लीला चाले //८//
मायेच्या राज्यात /सुखही लटके /
दु:खही लटके /स्वप्नापरी //९//
माझ्या मायेसाठी /हसतो रडतो /
भीतो रागावतो /खेळ करी //१०//
परि ध्यानी धरा /मेख ग्यानबाची /
सच्चिदानंदाची /वस्ती आत //११//