//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसूर्ये पाहो //
दयाळाच्या पोटी /उपजे करुणा /
दु:ख़ास हरण्या /सरसावे //१//
पहावेना डोळा /जगी भेदभाव /
पंढरीचा राव /होई कष्टी //२//
म्हणुन धाडतो /संत मांदियाळी /
अज्ञानकाजळी /झाडण्यासी //३//
सुखाचे पुतळे /पाहता भिउनी /
लागती चरणी /दु:ख क्लेश //४//
त्यांचा अंगीकार /संत करीती ते /
जसे बालकाते /माय घेई //५//
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २००८
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
