कापुराचे भेटी / आली ज्ञानज्योती
दोन्ही नष्ट होती / उरे काय //१//
दोन्ही नष्ट होती / उरे काय //१//
आरशाच्या पुढे / आरसा धरिला
नाहीसा तो झाला / दुजाभाव //२//
शिव समाधीत / भवानी चंचल
एकास पहाल / एका वेळी //३//
नित्य व अनित्य / दोन्ही नाही दूजे
ब्रह्म जेव्हा लाजे / माया दिसे //४//
ब्रह्म जेव्हा लाजे / माया दिसे //४//
एक मागे होता / दूजी पुढे येई
दर्शन ती देई / भक्तालागी //५//
ज्ञानचक्षु आणि / चर्मचक्षु दोन्ही
उघडे ठेविता / भेद नुरे //६//
निर्गुण सगुण / दोन्ही एकरुपे
जणू भासे रूपे / शिंपलीवर //७//
जणू भासे रूपे / शिंपलीवर //७//
*
हरि ॐ तत्सत्
*