शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

सद्गुरु



तू माझे रूप आहेसी
सद्गुरु मला बोलती
शिष्य बनवुनी नेती
गुरुत्वासी

तू मी नाही वेगळे
गुरुतत्व तुझ्यातले
सगळीकडे भरले
जगन्मात्री

पांडुरंग तू पाहसी
तयाची जगी वसति
वस्तु नसते कोणती
तयाविन

अनेकत्व जे दिसते
काजळी माया असते
ती सारिता उजळते
ज्ञानज्योती

तू नव्हताच अज्ञानी
घाबरला उगी स्वप्नी
आपुल्या स्वरूपज्ञानी
आता मिळ

"
मी" "माझे" शब्द त्याग
विठ्ठलाचे रूप जाण
अनन्यभावे शरण
त्याचा होई

रणात हा कृष्ण म्हणाला अर्जुना
मारले वै-यांना मीच स्वत:
फक्त तू धनुष्य बाण हाती धर
श्रेय तू स्वीकार माझ्या भक्ता
समाधि स्थितिच्या या चौरंगावर
बसून तू कर अज्ञानाचा नाश

दिला
अहंकार बळी
नाला मिळे गंगाजळी
थेंब मिळे वर्षाकाळी
सागरास

साईने हरली चिंता
साई कर्ता करविता
मी तयाचे पाय ध्याता
सुखी होई

राम कृष्ण हरि

सूचना - स्वत:मध्ये विठ्ठल पहायचा असेल तर
} शिव्या देणे बंद करा
} नशा दारु पिणे बंद करा
} मटन मासे कोंबडी खाणे,
मांसाहार बंद करा

} संयम पाळा
} देवाच्या नामाचा जप करा


मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

एल्गार





तुझे नाम रामा मी घेणार नाही

असा
नेम केला जरी मी किती


जिव्हा बोलते ऐकते नाम श्रुति


घोंघावते मन तुझ्याभोवती



अनाहत संकीर्तन तुझे येई कानी


सुगंध तुझा घ्राणि येई दिव्य


रुसण्यात माझ्या नसे अर्थ देवा


तुझ्याविना
जीवा नसे माझ्या ठाव



नसे
तू जिथे नेत्र पाहती तुला


कसे सांग रामा मी सोडू तुला


का वेड तू लाविले सांग मजला


दश इंद्रियांनीही एल्गार केला


माझा म्हणुनी पोशिला आजवर मी

अहंकार तोही ना माझा उरला

तू काय गारुड केलेस रामा

सगळ्यात मज तू दिसे एकला


स्वतंत्र नाही मी तुझा गुलाम

वेटाळुनी घातला प्राणबंध

तुझा मी तुझा मी अगा रामचंद्रा

युगानुयुगे आपुला हा संबंध

हजारो मुखांनी तुझी कीर्ति गाता

वाणी अपुरी शब्द विलयास जाती

विश्वात्मका मी तुझा शेष आहे

तुझ्याविना जरी नसे काही जगती




गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

कुठे जासी



तव भक्तीची उन्नत शिखरे
एक एक मी आक्रमितो
कधी प्रेमाने हर्षित होतो
कधी विरहाने व्याकुळतो

तुझ्या नि माझ्या प्रेमाचा हा
रंग आहे भलताच जुना
जीव शिवाच्या लपाछ्पीच्या
अनादी या दिसतात खुणा

अज्ञानाच्या अवगुंठनी मी
तू मायेच्या पडद्यात
तू माझा मी तुझा असुनी
मी व्यर्थ पोळतो दु:खात

विसरुनी तुज मी व्यथित होता
अवचित येतो तू पुढती
खुद्कन माझी कळी उमलते
सर्व व्यथा पळुनी जाती

तुझ्या मनीचे तूच जाणसी
मेहरबान जरी होसी तू
पुन्हा सोडुनी मला एकटा
कुठे फिराया जासी तू



बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

राम आहे



राम आहे राम आहे
राम कणात कणात
राम आहे राम आहे
राम देहात प्राणात

रामा तुझ्या आस्तित्वाचा
विसर मला पडत नाही
क्रोधाचे आणि दु:खाचे
चरे मनावर पडत नाही

तू आहेस म्हणून रामा
माझी फरफट होत नाही
कसल्याही भीतीने माझी
ससेहोलपट होत नाही

रामा तुझा आधार मला
जगण्यासाठी बळ देतो
तू सोडून गेलास तर
मी मातीमोल होतो



प्रेम




तुझ्या इच्छेसाठी जगतो मी देवा
चैतन्याचा ठेवा घेउनिया

आता नाही काही मज मिळविणे
काही हरवणे उरले नाही

एक मी एक तू दूजे नाही काही
एक हरि पाही चोहीकडे

शब्द हे सांडती चांदण्याची फुले
देवा उतू गेले प्रेम तुझे


सद्गुरुराया तुझ्या पायी माझी डोई

नाही उतराई होणे मज



सोमवार, १ ऑगस्ट, २०११

समाज



भोगलोलुपता नांदते इकडे
दारिद्रयाचे मढे एकीकडे

एकाला मिळेना चिंधी ल्यावयाला
नाचे बारबाला वस्त्रहीन

गडगंज कुणी बांधले इमले
कष्टकरी चाले अनवाणी

दुस-याचे दु: आम्हा ना डाचत
रोटी नाही देत कुणा कधी

मग्रुरीचे सारे झालेत अधीन
विचारतो कोण सज्जनाला

वाईटाच्यासाठी चढाओढ चाले
सगळेच झाले कष्टी फार

अतिरेकापोटी जातात गाळात
कुतरओढीत प्राण जाई

*
आधार शोधू नको
आधार हो
*
या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थित:
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै
नमो नम:


माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.