तू माझे रूप आहेसी
सद्गुरु मला बोलती
शिष्य बनवुनी नेती
गुरुत्वासी
तू व मी नाही वेगळे
गुरुतत्व तुझ्यातले
सगळीकडे भरले
जगन्मात्री
पांडुरंग तू पाहसी
तयाची जगी वसति
वस्तु नसते कोणती
तयाविन
अनेकत्व जे दिसते
काजळी माया असते
ती सारिता उजळते
ज्ञानज्योती
तू नव्हताच अज्ञानी
घाबरला उगी स्वप्नी
आपुल्या स्वरूपज्ञानी
आता मिळ
" मी" व "माझे" शब्द त्याग
विठ्ठलाचे रूप जाण
अनन्यभावे शरण
त्याचा होई
रणात हा कृष्ण म्हणाला अर्जुना
मारले वै-यांना मीच स्वत:
फक्त तू धनुष्य बाण हाती धर
श्रेय तू स्वीकार माझ्या भक्ता
समाधि स्थितिच्या या चौरंगावर
बसून तू कर अज्ञानाचा नाश
दिला अहंकार बळी
नाला मिळे गंगाजळी
थेंब मिळे वर्षाकाळी
सागरास
साईने हरली चिंता
साई कर्ता करविता
मी तयाचे पाय ध्याता
सुखी होई
ॐ राम कृष्ण हरि ॐ
सूचना - स्वत:मध्ये विठ्ठल पहायचा असेल तर
१} शिव्या देणे बंद करा
२} नशा दारु पिणे बंद करा
३} मटन मासे कोंबडी खाणे,
मांसाहार बंद करा
४} संयम पाळा
५} देवाच्या नामाचा जप करा
ॐ