सैरभैर झालो मी काहीही सुचेना
कुठे जाऊ सोडून तुज सांग रामराया
तुझ्याविना रामा मज जिणे कंठवेना
का रुसला माझ्यावर सांग रामराया
काय भार झालो मी तुजसी पोसवेना
कष्ट तुला दिले का मी सांग रामराया
तुझे चरण प्रिय मजसी जवळ राहू दे ना
दास तुझा आहे ना मी सांग रामराया
तू माझा तुझाच मी अन्य कुणाचा ना
तुझे पाय सुख माझे सख्या रामराया
अस्ति भाति प्रियत्वे तू सर्वस्वी माझा ना
विभुर्व्याप्य चैतन्या सांग रामराया
ॐ
माता रामो मत्पिता रामचंद्र: स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने
ॐ राम कृष्ण हरि ॐ
भेदु लाजौनि आवडी।येकरसी देत बुडी।
जो भोगणया ठाव काढी।द्वैताचा जेथे।।
ॐ