प्रकाश अंधार एकारले सारे
सूर्य चन्द्र तारे एक झाले
जवळ स्वतःच दूरचे ते झाले
परके आपले सारे एक
तू आणि तोपण झालो मी स्वतःच
नपुंसक तेच स्त्री पुरुष
बाप आणि माय बाळ स्वतः झाले
गुढगे टेकले व्याकरणे
वर्णन करू मी भाषेत कुठल्या
नाही ऐकावया दुजे कुणी
डोळे दृष्टी दृश्य आवाज व कान
कर्म आणि ज्ञान एक झाले
शब्दाचा विलय ध्वनी स्वतः झाला
अशा अवस्थेला काय म्हणु
एकपणे दिली बुडी ती स्वतःत
अर्थ तो मौनात विसावला
देवा तू दिलीस भक्ती मला दान
मला तुझ्यातून सूट दिली
त्यायोगे गातो मी तुझे गोड नाम
नाही तरी काम काय मला
सूर्य चन्द्र तारे एक झाले
जवळ स्वतःच दूरचे ते झाले
परके आपले सारे एक
तू आणि तोपण झालो मी स्वतःच
नपुंसक तेच स्त्री पुरुष
बाप आणि माय बाळ स्वतः झाले
गुढगे टेकले व्याकरणे
वर्णन करू मी भाषेत कुठल्या
नाही ऐकावया दुजे कुणी
डोळे दृष्टी दृश्य आवाज व कान
कर्म आणि ज्ञान एक झाले
शब्दाचा विलय ध्वनी स्वतः झाला
अशा अवस्थेला काय म्हणु
एकपणे दिली बुडी ती स्वतःत
अर्थ तो मौनात विसावला
देवा तू दिलीस भक्ती मला दान
मला तुझ्यातून सूट दिली
त्यायोगे गातो मी तुझे गोड नाम
नाही तरी काम काय मला
*
हरि ॐ तत्सत्
*