सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

शारदीय नवरात्रोत्सव



हे माते शारदे,
तू परब्रह्मस्वरूपिणी आहेस
तू आम्हां सारस्वतांची माता सरस्वती आहेस
तशीच तू वैष्णवांची माता लक्ष्मी आहेस
व तूच शैवांची माता दुर्गा आहेस

तुझ्या अनुज्ञेशिवाय आम्हाला
सच्चिदानंद परमपित्याचे
दर्शन होत नाही
हे देवी, तू तुझ्या कृपाकटाक्षाने
माझ्या आज्ञाचक्रास स्पर्श करुन
मला ज्ञानदृष्टी प्रदान केलीस

हे माते ,मी त्रिनेत्र गणेश
माझ्या ऋद्धि सिद्धि सह
तुझ्या चरणी नमन करतो
नवविधा भक्तिरूपी माझ्या र्हिदयसिंहासनी
विराजमान हो व मला पावन कर

शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

ऐक्ययोग

भेदभाव सारे /गेले विलयाला /
ऐक्याच्या गुढीला /उभारले //१//

विद्वेषाचे तण /मोडून टाकले /
आणि निवडले /आत्मज्ञान //२//

ज्ञानाचे अंजन /दृष्टिला फावले /
निधान दिसले /ऐक्ययोग //३//

प्रकाशाच्या वाटा /पुढे दिसतात /
मनोमिलनाचा /सण नामी //४//

तुझ्यासाठी देवा /गोडधोड करू /
उपासना करू /प्रसन्न हो //५//

अनंत तू देवा /अनंत हे ज्ञान /
अनंत हे सण /आम्हांसाठी //६//


गोडी


तुझे विश्वरूप /भव्यदिव्य जरी /
निर्गुणा इश्वरा /निराकारा //१//

समचरण दावी /पंढरीच्या नाथा /
टेकविण्या माथा /आसुसलो //२//

वाजे टाळघोळ /नामाचा गजर /
नाचती आतुर /भक्त तुझे //३//

गरुडाला खेव /देऊ होऊ मुक्त /
दर्शनाने तृप्त /तुझ्या होऊ //४//

नाही तू कृपण /सगुण संपन्न /
साकार होऊन /धन्य करी //५//

संशय आम्हाला /तिळभर नाही /
सगुण निर्गुण /तूच आहे //६//

शिव आणि विष्णु /भेद नसे काही /
ज्ञानदृष्टि पाहि /एक देव //७//

डोळे उघडून /पहा ज़रा सत्य /
काबा व काशीत /तोच आहे //८//

का देता बुद्धीस /वाउगा हा ताण /
साखर चाखून /गोडी पहा //९//

Om Jai Jagdish Hare ( Golden voice of Lata Mangeshkar )(must listen)

Sai teri kripaa.

रविवार, ६ सप्टेंबर, २००९

श्रीकृष्ण वंदन


मूकं करोति वाचालं
पंगुं लंघयते गिरिम्
यत्कृपा तमहं वन्दे
परमानन्दमाधवं

हरि ॐ तत् सत्


लढाई

कृपेमुळे तुझ्या /ध्यानी आले आता /
लढावे मी स्वत: /माझ्याशीच //१//

माझ्या दुर्गुणांशी /व्हावे मी निष्ठुर /
करावे मी ठार /अवगुण //२//

अज्ञानाच्या योगे /आसुरी संपदा /
बनते आपदा /माझी मला //३//

सहनशील मी /क्षमाशील जरी /
दुर्गुणांशी तरी /वज्र व्हावे //४//

पिकास पोसावे /तण निपटावे /
क्षेत्रपाळ व्हावे /विश्वक्षेत्री //५//

हेच कर्म माझे /हा न्याय तुझाही /
तळी क्षोभाच्याही /आपुलकी //६//

फणफणे जेव्हा /दैत्य अंहकार /
ही गदा उदार /मुक्ती देई //७//

सारेच उपाय /खुंटतात जेव्हा /
तुझे बळ तेव्हा /संचारते //८//

अन्यथा मी नाही /कर्म कर्ता भोक्ता /
सकळां पाहता /तूच दिसे //९//

माझ्यासह सारे /विश्व तूच आहे /
खेळत तू राहे /आत्मानंदी //१०//

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.