रविवार, ३० सप्टेंबर, २००७

अंकित

घेतले तू देवा / हिरावून सारे /
अंकित झालो रे / तुझा आता //१//

भूतकाळ तूच /वर्तमान तूच /
भविष्यही तूच / माझे झाला //२//

तुजवर देवा / झालो मी प्रसन्न /
तुझे हे जीवन / तुला दिले //३//

कुडीची कुणाला / फिकीर उरली /
तुझी आज्ञा झाली / शिरोधार्य //४//

तुझ्यासाठी काया / जपुन ठेवीन /
मज सांभाळीन / तुझ्यासाठी //५//

बेधुन्द झालो मी /तुझ्या आस्तित्वाने /
काया वाचा मने /तुझा झालो //६//

आम्ही तुझे

देवा तुझ्या दारी/ बरे भिक्षाटन/
पातके पतन/ नाही आम्हा //१//

नीती शास्त्र ज्ञान/ आम्हा ना ठाउक/
तुझे रुप एक/ दिसे आम्हा //२//

लुळे नि पांगळे/ बहिरे आंधळे/
अकलेने खुळे/ आम्ही तुझे //३//

तुझ्या इच्छेपुढे/ बाकीचे दिसेना/
जग हे ठणाणा/ करीतसे //४//

आपल्या मस्तीत/ आमचे जगणे/
जगाचे गा-हाणे/ तुझ्यापाशी //५//

तुझा झालो

देवा तुजवीन/ मज नाही कोण /
सगे गोतगण/ याती कूळ//१//

तूच दोष गुण/ तूच कामधाम /
तुझ्यात आराम /मिळे मज //२//

तुजवीन मज / नाही कुठे ठाव/
तूच माझे गाव / घर तूच //३//

तूच पुत्र कन्या / तूच पत्नी सखा /
माझा पाठीराखा / आहेस तू //४//

तुजवीन काही /उरले नाही रे /
सोडुनिया सारे /तुझा झालो //५//

शनिवार, १५ सप्टेंबर, २००७

समाधिस्थिती

सुंदर जे आहे /ते ते माझे रूप
उल्हासाचा ध्ह्यास /माझा आहे
बाळांचे रडणे/हसणे सुंदर
मुलांचे खेळणे/भांडणे सुंदर
वृद्धांचे वाकुन/चालणे सुंदर
पक्ष्यांचे बोलणे/झाडांचे डोलणे
वा-याचे वाहणे/मज प्रिय
दुनियेचे नका/करु कब्रस्तान
आनंदाला माझ्या /तोडू नका
जीवन वास्तव /आहे दुनियेचे
तेच माझे रूप /जाणा सत्य
मरण विराम /अल्पघटकेचा
जीवन प्रवाह /चिरंतन
समाधित जरी /मी तुम्हा दिसतो
दृष्टि तुम्हावर /सदा आहे
शरीराने जरी /दूर झालो आहे
वास्तव्य सतत /तुमच्यात

भवानी

हे भवानी तुझे पायी
चित्त माझे शांत होते
अशिव संहारुन माते
स्वरुपाचा बोध देते //१//

सुखाच्या वेशात येउनी
मानवाला दुःख छ्ळते
राक्षसी उन्माद मारुनी
तू मनाला शांतवीते //२//

भूक मजला मंगलाची
अमंगल परि माजले
अंत त्या बिभत्सतेचा
करुनी मज तू रक्षिते //३//

परब्रह्मस्वरुपिनी तू
शिवाहुनी तू वेगळी ना
छद्मज्ञानरूपी अहंता
ओळखोनी चिरडीते //४//

तूच जननी या जगाची
चंडिका बनतेस तू
कुतर्काचा नाश करुनी
आत्मसत्ता स्थापिते //५//

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २००७

शिवभवानी


कापुराचे भेटी / आली ज्ञानज्योती
दोन्ही नष्ट होती / उरे काय //१//
आरशाच्या पुढे / आरसा धरिला
नाहीसा तो झाला / दुजाभाव //२//
शिव समाधीत /भवानी चंचल
एकास पहाल /एका वेळी //३//
नित्य व अनित्य /दोन्ही नाही दूजे
ब्रह्म जेव्हा लाजे / माया दिसे //४//
एक मागे होता /दूजी पुढे येई
दर्शन ती देई/ भक्तालागी //५//
ज्ञानचक्षु आणि /चर्मचक्षु दोन्ही
उघडे ठेविता / भेद नुरे //६//
निर्गुण सगुण/ दोन्ही एकरुपे
जणू भासे रूपे /शिंपलीवर //७//

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.