हे भवानी तुझे पायी
चित्त माझे शांत होते
अशिव संहारुन माते
स्वरुपाचा बोध देते //१//
सुखाच्या वेशात येउनी
मानवाला दुःख छ्ळते
राक्षसी उन्माद मारुनी
तू मनाला शांतवीते //२//
भूक मजला मंगलाची
अमंगल परि माजले
अंत त्या बिभत्सतेचा
करुनी मज तू रक्षिते //३//
परब्रह्मस्वरुपिनी तू
शिवाहुनी तू वेगळी ना
छद्मज्ञानरूपी अहंता
ओळखोनी चिरडीते //४//
तूच जननी या जगाची
चंडिका बनतेस तू
कुतर्काचा नाश करुनी
आत्मसत्ता स्थापिते //५//
शनिवार, १५ सप्टेंबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
