मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

पाऊस

तृषार्त चोचीमधे टपोरा
थेंब जळाचा पडतो
शिंपल्यामधे बिंदु स्वातीचा
मोती सुंदर होतो
अमृतवर्षावाने धरणी
थंडगार बहरते
तृप्तीचा हुंकार देऊनी
तृणपाते लवलवते
ऐसे का रे मेघा म्हणसी
उगाच मी बरसतो
तूच वाहतो नद्या होऊनी
सिंधूतीर्थ तू होतो
वाफ होऊनी वैकुंठासी
जासी पुन्हा वर्षसी
जन ताराया घन बनुनी तू
पुन्हा पुन्हा अवतरसी
हरि ॐ तत्सत्

बुधवार, २९ मार्च, २०२३

विश्रांती

चुलीवर पातेले ठेवलेय. खाली आग भडकलीय. आणि पातेल्यात पाणी उकळत आहे. मी डोके धरून चिंताक्रांत होऊन आटोकाट प्रयत्न करतोय या पाण्याला थंड करण्यासाठी. पण पाणी उकळणे बंद होत नाही.
👆🏻 ही आहे माझी ध्यानसाधना व माझी जपसाधना
माझी साधना यशस्वी होण्यासाठी मी काय करू ?
please सांगा मी काय करू ?
मला वाटते की मी पातेले आगीवरून खाली उतरवले तर कदाचित थोड्या वेळाने पाणी आपोआपच गार होईल.
मी बरोबर सांगतोय का ?
पण हे मी कसे करू शकतो ? मला संसार आहे. प्रपंच आहे. मला १० मिनिटे पण एकांत मिळत नाही.
पातेले आगीवरून खाली न उतरवता पाणी गार कसे करायचे ते मला सांगा. बाकीची भंकस करू नका.
क्षमा करा पण हे सगळ्या दुनियेचे म्हणणे आहे.
यावर एकांत हे एकच रामबाण औषध आहे. ही एकच वाट मुक्तीकडे घेऊन जाते.
एकांतच माझा सखा
जन वन सारे एकांत
मी बुडलो आहे डोही
रमणीय दिव्य सौख्यात
आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होतोय ते ओळखा व त्या गोष्टींपासून दूर जा.
या अभ्यासाने मन हळूहळू शांत होईल. अगदी थंडगार बर्फ होईल.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत।।
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।
कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी।।
हरि ॐ तत्सत्
श्री राम नवमी
__________
 दुपारचा विसावा
दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो, तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.

त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहून वाटत  होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा असावा .

मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. 
तो शेपूट हलवत तिथेच बसून राहिला.

मी उठून घरात निघालो, तसा तोही माझ्या  मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून, पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.
 
पहाता पहाता, झोपीही गेला.
मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो.

तासाभराने तो उठून दाराकडे निघाल्यावर, मी  उठून दार उघडले.
तो सरळ कंपाउंड बाहेर गेला. बहुधा, त्याच्या घरी गेला असावा!

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला. 
तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला, आणि तासाभराने उठून निघून गेला.

*मग हे रोजचेच झाले*.

तो यायचा, झोप काढायचा व निघून जायचा. असे कित्येक आठवडे झाले.

मला उत्सुकता लागून राहिली की , हा नेमका कुणाचा आहे ?

मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहून अडकवली. 

"तुमचा कुत्रा  रोज माझ्याकडे  येऊन झोप काढतो, हे तुम्हाला माहित आहे का?" 

दुसऱ्या दिवशी, पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला, पण, यावेळी त्याच्या पट्ट्याला एक चिठ्ठी दिसत होती. मी ती काढून वाचू लागलो.....

"टॉमी एक चांगल्या घरचा कुत्रा आहे. इथे माझ्या सोबतच रहातो. पण, माझ्या बायकोच्या अखंड बडबडीला कंटाळून, थोडीशी तरी झोप मिळावी म्हणून तो  रोज तुमच्याकडे येतो....उद्यापासून मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ?

चिठ्ठी लावून कळवणे!"
स्थळ अर्थातच *पुणे* !

🥱🥱

मंगळवार, २८ मार्च, २०२३

तुम्ही स्वतः

स्पर्श, गंध, ध्वनी, दृश्य, चव यांच्यापासून फारकत घ्या. शांतपणे डोळे मिटून बसा. इंद्रियगत ज्ञानाचा वापर थांबवल्यावर आत फक्त जाणीव उरते.  ती तुम्ही स्वतः आहात. परंतु त्या जाणीवेला शरीराची मर्यादा नाही. ते तुमचे सर्वव्यापक स्वरूप आहे. ते शरीराचे नसते. त्यामुळे त्याला शरीराच्या जन्म, मृत्यू व वयाचे बंधन नसते. हे सर्व तुम्ही आज, आता, ताबडतोब अनुभवू शकता. हे सर्व साक्षात अनुभववणे कुणालाही सहज शक्य आहे.

गुरुवार, २३ मार्च, २०२३

गोड गीता

गोड गीता 
तुझ्या आवडीनुसार, आनंदाने, तुला जसे पाहिजे तसे काम कर. तुला काम करण्याची खूप हौस आहे व तुला काम करण्यातून भरपूर आनंद मिळतो हे मला कळते. मी तुला त्याबद्दल कधीही, काहीच आडकाठी करणार नाही. तुला पाहिजे ते काम, तुझ्या मनासारखे करण्याकरिता, हे माझे संपूर्ण जग तुझ्यासाठी मोकळे आहे. 
🌼🌷🌷🌼
सर्व भार माझ्यावर घालून पाहिजे तसा खेळ. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. कारण तू मला फार आवडतोस. मी तुला माझ्या या संपूर्ण जगात, कुठल्याही कामासाठी मनाई करणार नाही. व मी स्वतः तुझ्या जीवनयापनाची, योगक्षेमाची हमी देतो. तुला पोसणारा मी आहे. तुझे पालनपोषण मी नेहमीच करत राहीन. त्यामुळे कशाचीही काळजी, चिंता अजिबात करू नकोस. माझ्यावर भरोसा ठेऊन निर्धास्तपणे आवडीचे काम मजेत करत रहा. तुला असे खेळताना पाहून माझा आनंद वाढत रहातो व माझे तुझ्यावरील प्रेमही वाढत रहाते. मी जगन्निवासी भगवंत आहे व तू माझा अतिप्रिय कर्मयोगी भक्त आहेस. हे सारे जग तुझेच स्वतःचे घर आहे असे खात्रीने समज.
🌼🌷🌷🌼
तू काम यशस्वीपणे केले नाहीस, तुला अपयश आले किंवा तू अर्धवट काम केलेस, तुझे काम अपुरे राहिले तरीही काही नुकसान नाही. कारण यातून आपल्याला काहीही मिळवायचे नाही. तू खूष रहावा, तुझा वेळ आनंदात जावा एवढीच माझी इच्छा आहे. तुझ्या मनाचे समाधान व्हावे एवढीच माझी अपेक्षा आहे. तू मन लाऊन काम करतोस पण खेळता खेळता तुझे एखादे खेळणे तुटले तर मी तुला दुसरे खेळणे देईन. खेळता खेळता तू थकून झोपी गेलास तर मी तुझ्या अंगावर पांघरुण घालीन. मी पूर्ण relax आहे. तूही अगदी पूर्ण relax होऊन कामाचा आनंद घे.👍🏻
हा गोड कर्मयोग कृष्णाने ( जिवंत व जागृत देवाने ), कनवाळू बापाच्या मायेने, अतिप्रितीपूर्वक, अतिशय मृदू अंतःकरणाने पण ठामपणे, संपूर्ण मानवजातीला सांगितला आहे.
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले 
अवघे चि जालें देह ब्रह्म 
आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें
नवल देखिलें नभाकार गे माये 
बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला 
हृदयीं नटावला ब्रम्हाकारें 
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
हरि ॐ तत्सत्
संकष्ट चतुर्थी

कर्म

[13/01, 7:24 pm] Dattaprasad: 
मूळ श्लोकः
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते।।4.14।।
कर्म मुझे लिप्त नहीं करते (क्योंकि मुझमें कर्तृत्व का अहंकार नहीं है);  न मुझे कर्मफलकी चाहत है। इस प्रकार मुझे जो जानता है, वह भी कर्मों से नहीं बन्धता है।।
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ २४ ॥
(जिस कर्मयज्ञमें) अर्पण ब्रह्म है, हवन-द्रव्य भी ब्रह्म है, तथा ब्रह्मरूप कर्ताके द्वारा ब्रह्मरूप अग्निमें आहुति देनेकी क्रिया भी ब्रह्मरुप है- उस ब्रह्मकर्मरुप समाधि द्वारा प्राप्त किये जाने योग्य फल भी ब्रह्म ही है ।
ब्रह्म म्हणजेच श्रीकृष्ण परमात्मा होय. तोच सर्वात्मक ईश्वर आहे.
विठ्ठलाचे सर्व जातीधर्माचे भक्त आपापली विहित कर्मे ( कर्मयज्ञ ) करत होते. जसे कुंभार, सोनार, महार, शिंपी, चांभार, न्हावी, माळी, कसाई अथवा घरकाम करणारी दासी इत्यादी; हे सर्वजण करत असलेली ही सर्व कर्मे ब्रह्मरूप होती.
निरहंकारपणे, निरीच्छपणे, निःस्वार्थ बुद्धीने केले जाणारे कर्म हेच स्वतः ईश्वर आहे.
कर्मयोग म्हणजे
१) कर्तृत्व स्वतःकडे न घेणे.
२) फळाची अपेक्षा न करणे.
याव्यतिरिक्त कितीही मोठी मोठी कामे केली तरी ती कर्मयोग होत नाही. कामांचे डोंगर उभे करणे म्हणजे कर्मयोग नाही.
आजच्या काळातसुद्धा कुणीही कसलेही काम करणारी व्यक्ती ( टर्नर, फिटर, वेल्डर, वायरमन, मजूर, इंजिनिअर, डॉक्टर, पेन्टर,  डायरेक्टर, नेता, सफाई कामगार इत्यादी ) ब्रह्मरूप होण्यास योग्य आहे.
स्वधर्मु जो बापा, तोचि नित्ययज्ञु जाण पां।
म्हणोनि वर्ततां तेथ पापा, संचारु नाहीं ॥ ८१ ॥
येथे स्वधर्म म्हणजे प्राप्तकर्म होय.
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते।।18.53।।
अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध और परिग्रह को त्याग कर ममत्वभाव से रहित और शान्त व्यक्ती ब्रह्म प्राप्ति के योग्य बन जाता है।।
सोपे आहे. संतांचा पाठलाग करून हे सहज शक्य आहे.
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
येरांनी वहावा भार माथा
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ
माझ्याकडे आला आणि वाया गेला
दाखवा दाखवा ऐसा कोणी
ॐ साईगुरवे नमः
नाम संकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरीची ।
न लगे सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ॥धृ॥
ठाईच बैसोनी करा एक चित्त ।
आवडी अनंत आळवावा ॥१॥
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी ।
शहाणा तो धनी येतो येथे ॥३॥
तया सर्वात्मका ईश्वरा । 
स्वकर्म कुसुमांची वीरा । 
पूजा केली होय अपारा।
तोषालागी ।।
ज्ञानेश्वरी ।।१८-९१७।।
खंडेराया मल्हारीमार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट
जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
|| कृष्णार्पण ||
मकरसंक्रांति

सोमवार, २० मार्च, २०२३

कृषीसहकार

उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।।
|| विना सहकार नाही उद्धार ||
एकटे कार्य करू नका, एकत्रित व्हा. YOU HAVE GREAT POTENTIAL. तुम्ही समर्थ आहात, सक्षम आहात याची खात्री बाळगा. कुणीतरी त्रयस्थ व्यक्ती किंवा सरकार तुमची मदत करील, या आशेवर बसू नका.
मी भारतीय आहे. यू ट्यूबवर आर्थिक व औद्योगिक सुधारणांबाबत अनेक व्हिडीओंचा पूर आलेला पाहतो. परंतु शेतीविषयावर एकही चित्रफीत नाही. भारत कृषीप्रधान देश आहे.
The agriculture sector is one of the most important industries in the Indian economy. In terms of employment, the agriculture sector provides livelihood to over 151 million people. Approximately 60 percent of the Indian population works in this industry, contributing about 18 percent to India's GDP. 26-Jan-2023
 शेती हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. याकडे वर्तमान परिस्थितीमध्ये अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसते. खेड्यातच खरा भारत नांदतो. पण भारताला अनैसर्गिकपणे अमेरिका किंवा चीन बनवले गेले तर त्याचे अनेक सामाजिक दुष्परिणाम पहायला मिळतील. उदाहरणार्थ शहरांकडे पळणाऱ्या माणसांच्या लोंढ्यांचे नियोजन व शहरी विकासकामांसाठी व्यवस्थेवर येणारा अनियंत्रित ताण, झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन, विस्थापन. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी अनेक प्रश्न उद्भवणारच नाहीत जर खेडी स्वयंपूर्ण झाली, बळीराजा सधन, संपन्न झाला तर. हे खरे तर वैश्विक सत्य आहे. आपण सगळेच जण निसर्गाचा हात सोडून भलतीकडेच भरकटत चाललो आहोत. आपल्या ( माणसाच्या ) मूलभूत गरजा एवढ्या जास्त नाहीतच. आपण कशासाठी हा सर्व तथाकथित विकास फुगवटा  करत आहोत ? जिथे आपल्याला श्वास घ्यायला स्वच्छ हवा मिळणे देखील मुश्किल होते अशा तऱ्हेची शहरे वाढवण्यात काय फायदा ? 
काय असल्या शांघायचा आणि सिंगापूरचा उपयोग ? अमर्त्य सेन यांच्या अर्थशास्त्राकडे दुर्लक्ष करणे दुर्दैवी ठरेल. गांधीजींनीही 'खेड्याकडे चला' हाच मंत्र दिला होता जो मंत्र आज आपण विसरलो आहोत. आजकाल गांधीजींच्याऐवजी गोडसेचे गोडवे गायले जात आहेत. हे सगळेच अनैसर्गिक व अनाकलनीय आहे. गोडसेने पाकिस्तानात जाऊन जिन्नाला ठार  मारले असते तर  मी गोडसेलाही शहीदांच्या यादीत सामील केले असते. परंतु हे गोडसेचे नातेवाईक, भारतीय इतिहासावर व तत्वज्ञानावर बंदूक चालवू लागलेत. भारतीयत्वाचा खून करायला निघालेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अभिमानास्पद तेजस्वी झळाळत्या इतिहासावर अशीच चिखलफेक चालू राहिली तर त्यामुळे आपल्या पुढील पिढ्या मनाने पांगळ्या होतील, खच्ची होतील. मी अमर्त्य सेन आणि गांधीजी यांचा उल्लेख करतोय याचे कारण हे आहे की त्यांच्या शिकवणुकीला दूर लोटून तळागाळातील माणूस सुखी होऊ शकणार नाही. खेड्यातील संस्कृतीचा व अर्थकारणाचा विनाश होईल. हे आपण थांबवलेच पाहिजे. हरीत क्रांती व श्वेत क्रांतीची अमृतमधुर फळे आपण आजही चाखतोय हे विसरून कसे चालेल ? अशाच शेतीपूरक व्यवसायांच्याही नवनवीन योजना अमलात आणा. ARTIFICIAL INTELLIGENCE BASED HIGHTECH ORGANIC FARMING, सेंद्रिय कचरा पुनर्वापर, स्वच्छ इंधन,  मासळीपालन, अन्नप्रक्रिया, शेतीमालाची शेतावरून थेट निर्यात, आडत्यांच्या व व्यापाऱ्यांच्या साखळीतून शेतकऱ्यांची सुटका, grading, packaging, marketing, सामुदायिक शेती, vertical farming,  green house farming यासाठी अमूलसारख्या सहकारी कंपन्यांच्या चळवळींचा समावेश, शेतकऱ्यांना training व पतपुरवठा, तसेच शेतकऱ्यांच्या मरगळलेल्या, कोमेजलेल्या मनांना मानसिक उभारी देणे. नदी जोड प्रकल्पाचा प्रकर्षाने पाठपुरावा व प्रयत्नपूर्वक त्वरेने अंमलबजावणी, इत्यादी अनेक गोष्टींवर विचार करा, भूमीहीन शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी धोरणे ठरवा व त्यानुसार कृती करा. तरूणांच्या उच्चशिक्षणाचा व प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग SMART अत्याधुनिक शेतीसाठीच करता येईल असा धडक कार्यक्रम हाती घ्या. आपण पुष्कळ काही करू शकतो. आपण अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या देशांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर टिकून राहू शकतो.
सुधारणा या करायच्याच असतात. परंतु स्वतःच्याच इतिहासाला लांछन लावून नाही तर पूर्वसूरींचे बोट धरूनच भविष्यातील वाटचाल करा. इतिहासाचा उज्ज्वल आधार धुडकावून दिला तर आपलेच पाय निश्चितपणे पांगळे झाल्याशिवाय रहाणार नाहीत हे ध्यानात घ्या. 
|| यत्न तो देव जाणावा ||
आपुलिया बळे नाही बोलवत 
सखा कृपावंत वाचा त्याची ॥
काय म्या पामरे बोलावी उत्तरे 
परी त्या विश्‍वंभरे बोलविले ॥
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी
शिकविता धनी वेगळाची ॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कला 
वागवी पांगुळा पायावीण ॥
हरि ॐ तत्सत्
तुकाराम बीज

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.