चुलीवर पातेले ठेवलेय. खाली आग भडकलीय. आणि पातेल्यात पाणी उकळत आहे. मी डोके धरून चिंताक्रांत होऊन आटोकाट प्रयत्न करतोय या पाण्याला थंड करण्यासाठी. पण पाणी उकळणे बंद होत नाही.
👆🏻 ही आहे माझी ध्यानसाधना व माझी जपसाधना
माझी साधना यशस्वी होण्यासाठी मी काय करू ?
please सांगा मी काय करू ?
मला वाटते की मी पातेले आगीवरून खाली उतरवले तर कदाचित थोड्या वेळाने पाणी आपोआपच गार होईल.
मी बरोबर सांगतोय का ?
पण हे मी कसे करू शकतो ? मला संसार आहे. प्रपंच आहे. मला १० मिनिटे पण एकांत मिळत नाही.
पातेले आगीवरून खाली न उतरवता पाणी गार कसे करायचे ते मला सांगा. बाकीची भंकस करू नका.
क्षमा करा पण हे सगळ्या दुनियेचे म्हणणे आहे.
यावर एकांत हे एकच रामबाण औषध आहे. ही एकच वाट मुक्तीकडे घेऊन जाते.
एकांतच माझा सखा
जन वन सारे एकांत
मी बुडलो आहे डोही
रमणीय दिव्य सौख्यात
आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होतोय ते ओळखा व त्या गोष्टींपासून दूर जा.
या अभ्यासाने मन हळूहळू शांत होईल. अगदी थंडगार बर्फ होईल.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत।।
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।
कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी।।
हरि ॐ तत्सत्
श्री राम नवमी
__________
दुपारचा विसावा
दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो, तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.
त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहून वाटत होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा असावा .
मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
तो शेपूट हलवत तिथेच बसून राहिला.
मी उठून घरात निघालो, तसा तोही माझ्या मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून, पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.
पहाता पहाता, झोपीही गेला.
मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो.
तासाभराने तो उठून दाराकडे निघाल्यावर, मी उठून दार उघडले.
तो सरळ कंपाउंड बाहेर गेला. बहुधा, त्याच्या घरी गेला असावा!
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.
तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला, आणि तासाभराने उठून निघून गेला.
*मग हे रोजचेच झाले*.
तो यायचा, झोप काढायचा व निघून जायचा. असे कित्येक आठवडे झाले.
मला उत्सुकता लागून राहिली की , हा नेमका कुणाचा आहे ?
मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहून अडकवली.
"तुमचा कुत्रा रोज माझ्याकडे येऊन झोप काढतो, हे तुम्हाला माहित आहे का?"
दुसऱ्या दिवशी, पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला, पण, यावेळी त्याच्या पट्ट्याला एक चिठ्ठी दिसत होती. मी ती काढून वाचू लागलो.....
"टॉमी एक चांगल्या घरचा कुत्रा आहे. इथे माझ्या सोबतच रहातो. पण, माझ्या बायकोच्या अखंड बडबडीला कंटाळून, थोडीशी तरी झोप मिळावी म्हणून तो रोज तुमच्याकडे येतो....उद्यापासून मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ?
चिठ्ठी लावून कळवणे!"
स्थळ अर्थातच *पुणे* !
🥱🥱