गोड गीता
तुझ्या आवडीनुसार, आनंदाने, तुला जसे पाहिजे तसे काम कर. तुला काम करण्याची खूप हौस आहे व तुला काम करण्यातून भरपूर आनंद मिळतो हे मला कळते. मी तुला त्याबद्दल कधीही, काहीच आडकाठी करणार नाही. तुला पाहिजे ते काम, तुझ्या मनासारखे करण्याकरिता, हे माझे संपूर्ण जग तुझ्यासाठी मोकळे आहे.
🌼🌷🌷🌼
सर्व भार माझ्यावर घालून पाहिजे तसा खेळ. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. कारण तू मला फार आवडतोस. मी तुला माझ्या या संपूर्ण जगात, कुठल्याही कामासाठी मनाई करणार नाही. व मी स्वतः तुझ्या जीवनयापनाची, योगक्षेमाची हमी देतो. तुला पोसणारा मी आहे. तुझे पालनपोषण मी नेहमीच करत राहीन. त्यामुळे कशाचीही काळजी, चिंता अजिबात करू नकोस. माझ्यावर भरोसा ठेऊन निर्धास्तपणे आवडीचे काम मजेत करत रहा. तुला असे खेळताना पाहून माझा आनंद वाढत रहातो व माझे तुझ्यावरील प्रेमही वाढत रहाते. मी जगन्निवासी भगवंत आहे व तू माझा अतिप्रिय कर्मयोगी भक्त आहेस. हे सारे जग तुझेच स्वतःचे घर आहे असे खात्रीने समज.
🌼🌷🌷🌼
तू काम यशस्वीपणे केले नाहीस, तुला अपयश आले किंवा तू अर्धवट काम केलेस, तुझे काम अपुरे राहिले तरीही काही नुकसान नाही. कारण यातून आपल्याला काहीही मिळवायचे नाही. तू खूष रहावा, तुझा वेळ आनंदात जावा एवढीच माझी इच्छा आहे. तुझ्या मनाचे समाधान व्हावे एवढीच माझी अपेक्षा आहे. तू मन लाऊन काम करतोस पण खेळता खेळता तुझे एखादे खेळणे तुटले तर मी तुला दुसरे खेळणे देईन. खेळता खेळता तू थकून झोपी गेलास तर मी तुझ्या अंगावर पांघरुण घालीन. मी पूर्ण relax आहे. तूही अगदी पूर्ण relax होऊन कामाचा आनंद घे.👍🏻
हा गोड कर्मयोग कृष्णाने ( जिवंत व जागृत देवाने ), कनवाळू बापाच्या मायेने, अतिप्रितीपूर्वक, अतिशय मृदू अंतःकरणाने पण ठामपणे, संपूर्ण मानवजातीला सांगितला आहे.
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले
अवघे चि जालें देह ब्रह्म
आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें
नवल देखिलें नभाकार गे माये
बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला
हृदयीं नटावला ब्रम्हाकारें
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
हरि ॐ तत्सत्
संकष्ट चतुर्थी