सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

दास्यत्व





कष्ट साहतोसी माझ्यासाठी देवा
जिव्हाळा वर्णावा कैसा तुझा

प्रेमभावे माझे दाटले ह्रदय
कोणत्या उपाये व्यक्त करू

तुझ्या कृपाभारे वाकले हे झाड
लेकरांना धाड फळे खाया

मज
रामा तुझे दास्यत्व आदिम
नामाचा उदिम सर्वकाळ

माझ्यापुढे काय मोक्षाचे ते काम
नामाचा डिंडिम वाजवी मी

दुमदुमो माझ्या देहाची ही खोळ
केले हे राउळ तुझ्या नामे

दाही दिशातून तूच मज भेटो
अन्य ना उमटो दृश्य काही

विठोबा तुजला हेच गा मागणे
इतर सुचणे नको मला

राम कृष्णी रत राहो माझे चित्त
दिसो दिनरात तुझे रूप

तुझा दिव्य भाव वसो माझ्या देही
नसे अन्य काही आस माझी

रामा हरि कृष्णा विठो नारायणा
पुरवी वासना जन्मोजन्मी

वाजो टाळघोळ मृदुंग कल्लोळ
गळा तुळशीमाळ हिंदोळावी

डोलो माझे पाय नामाच्या गजरी
राहो खांद्यावरी झेंडा तुझा





गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

दास




तुजविण रामा । क्षण कंठवेना ।
तुज जाणवेना । व्यथा माझी ।।


जिवलग सखा । तुजऐसा नाही ।
कृपादृष्टि पाही । मज देवा ।।


एकला मी मृग । जग व्याध झाले ।
मरण लागले । पाठी माझ्या ।।


सांगतो निक्षून । अखेरचे तुला ।
सोडून तू मला । जाऊ नको ।।


जसा
आहे तसा तुझा आहे देवा
गोड हा करावा मूढ़ बोल ।।


भले बुरे काही जाणत मी नाही
तोंडाला जे येई बरळतो ।।


मज दिले बळ त्याने मी फुगतो
वल्गना करतो अभिमाने ।।


रामा राहशील सोडून मजला
कसा मी एकला। जगणार ।।


मज घे जवळ आपला जाणून
दास आहे दीन देवा तुझा ।।


आस आहे एक तुझ्या आनंदाची
माझ्या जीवनाची सार्थकता ।।





मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

विदेही






हे परमेश्वरा,
मी जेव्हा शहरापासून दूर,
माळरानावर पहुडलेलो असतो
तेव्हा इतर माणसांचा,
कुठल्याही कर्माचा
किंवा वासनेचा, अतृप्तिचा,
सुखदु:खाचा, क्रोधाचा,
कसलाही संस्कार नसतो.
मन स्फटीकासारखे शुद्ध,
नितळ स्वच्छ असते
कशाचीही गरज नसते
व काही नकोसे झाले
असेही नसते.
मी माझ्या शुद्ध स्वरूपात असतो.
दुरवर उघड्या बोडक्या
माळरानाशिवाय
काहीही नसते ;
आभाळभर तू असतोस
व परमेश्वरा,
तुझ्या भव्यतेची
एकच जाणीव
मनात उतरत असते.
देवा, तेव्हा तुझी माझी
तार जुळते
व सुंदर संगीत सुरु होते
मला पुन्हा माणसात जाणे
नको असते तरीही
कधीतरी देहभावावर यावे लागते
व या दीन दुनियेच्या
हीन लढाईत
सामिल व्हावे लागते.



दिगम्बराय विद्महे
अवधुताय धीमहि
तन्नो दत्त: प्रचोदयात

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.