
हे परमेश्वरा,
मी जेव्हा शहरापासून दूर,
माळरानावर पहुडलेलो असतो
तेव्हा इतर माणसांचा,
कुठल्याही कर्माचा
किंवा वासनेचा, अतृप्तिचा,
सुखदु:खाचा, क्रोधाचा,
कसलाही संस्कार नसतो.
मन स्फटीकासारखे शुद्ध,
नितळ स्वच्छ असते
कशाचीही गरज नसते
व काही नकोसे झाले
असेही नसते.
मी माझ्या शुद्ध स्वरूपात असतो.
दुरवर उघड्या बोडक्या
माळरानाशिवाय काहीही नसते ;
आभाळभर तू असतोस
व परमेश्वरा,
तुझ्या भव्यतेची
एकच जाणीव
मनात उतरत असते.
देवा, तेव्हा तुझी माझी
तार जुळते
व सुंदर संगीत सुरु होते
मला पुन्हा माणसात जाणे
नको असते तरीही
कधीतरी देहभावावर यावे लागते
व या दीन दुनियेच्या
हीन लढाईत
सामिल व्हावे लागते.
मी जेव्हा शहरापासून दूर,
माळरानावर पहुडलेलो असतो
तेव्हा इतर माणसांचा,
कुठल्याही कर्माचा
किंवा वासनेचा, अतृप्तिचा,
सुखदु:खाचा, क्रोधाचा,
कसलाही संस्कार नसतो.
मन स्फटीकासारखे शुद्ध,
नितळ स्वच्छ असते
कशाचीही गरज नसते
व काही नकोसे झाले
असेही नसते.
मी माझ्या शुद्ध स्वरूपात असतो.
दुरवर उघड्या बोडक्या
माळरानाशिवाय काहीही नसते ;
आभाळभर तू असतोस
व परमेश्वरा,
तुझ्या भव्यतेची
एकच जाणीव
मनात उतरत असते.
देवा, तेव्हा तुझी माझी
तार जुळते
व सुंदर संगीत सुरु होते
मला पुन्हा माणसात जाणे
नको असते तरीही
कधीतरी देहभावावर यावे लागते
व या दीन दुनियेच्या
हीन लढाईत
सामिल व्हावे लागते.
ॐ दिगम्बराय विद्महे
अवधुताय धीमहि
तन्नो दत्त: प्रचोदयात