मंगळवार, १८ जानेवारी, २०११

कथा माझी



किती दुखापती झाल्या

बहु ठेचकाळलो मी

काट्याकुट्यातून रामा

तुझ्यासाठीच आलो मी


आता तुझ्या मांडीवर

माझा ठेवून माथा मी

झोप घेईन निवांत

असे तुला म्हणता मी


अंघोळ मी नाही केली

असे काय म्हणतो तू

देवा शोभते का तुला

काय बोलतोस हे तू


तुझ्यासाठी गांजलो मी

एक तुज ध्येय केले

नाही अन्य उठाठेव

मज करणे जमले


परि जाणून घे भाव

मन-शरीराची व्यथा

नाही झाले गंगास्नान

काय सांगू माझी कथा


देवा फक्त तुझी ओढ

मज खेचून आणते

अन्य काही ना दिसते

अन्य काही ना सुचते


नाही मंत्र स्नान दान

नाही पुराण कीर्तन

तुझे गोंडस हे ध्यान

हीच माझी साठवण


नाही अन्य आठवण

धुडकावले मी सारे

विनवितो देवा तुला

मज जवळ तू घे रे


तुझ्या नामाविन नाही

पुण्य गाठीला जोडले

देवा गोड घे करून

माझे संचित मी दिले


जगण्याला माझ्या अन्य

अर्थ उरलाच नाही

मज जवळ तू घ्यावे

पर्याय दुसरा नाही


हरि ॐ

देहवैकल्याचा वारा।झणें लागेल या सुकुमारा।
म्हणोनि आत्मबोधाचां पांजिरां।सुयें तयातें।।
ईशावास्यमिदं सर्वम्

सोमवार, १० जानेवारी, २०११

इस्कोट



काय करू ह्या येड्यांना
ह्यांना राम हा दिसना
काळ्यातबी गो-यातबी
गड्यातबी बायातबी
राम समद्यात भिनला
समदं भरून उरला
इच्यार करता थोडा
की हानू टक्कु-यात जोडा
उगा दारू ढोसत्यात
माशे मटन खात्यात
भोग वासनेच्या पायी
जीव तुमचा गुंतला
करा मरनाचा इच्यार
मसनवटा जवळ आला
राम तवाच सुचल
नसता जीव घुटमळल
जीनगानीचा इस्कोट
आरं तुमचा तुमी केला
वखुत थोडा रं -हाईला
आता राम राम बोला
कधी तरी पंढरीला
जा इठुच्या दरशनाला

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.