तृषार्त चोचीमधे टपोरा
थेंब जळाचा पडतो
शिंपल्यामधे बिंदु स्वातीचा
मोती सुंदर होतो
अमृतवर्षावाने धरणी
थंडगार बहरते
तृप्तीचा हुंकार देऊनी
तृणपाते लवलवते
ऐसे का रे मेघा म्हणसी
उगाच मी बरसतो
तूच वाहतो नद्या होऊनी
सिंधूतीर्थ तू होतो
वाफ होऊनी वैकुंठासी
जासी पुन्हा वर्षसी
जन ताराया घन बनुनी तू
पुन्हा पुन्हा अवतरसी
हरि ॐ तत्सत्