एषणात्रय सांडले मी आत्मस्वरुपी ईश्वरा
तूच मी अन मीच तू अद्वैतबोधप्रकाश हा
प्रीत माझी तुझी रामा तूच जाणे ईश्वरा
दुर्बळांनी काय ल्यावा सतीचा श्रृंगार हा
अखंडैक्ययोग रामा तुझा माझा ईश्वरा
कामनेसी ठावा ना वैराग्य कीर्तन रंग हा
तेवते सुख शांत ज्योती नित्य ह्रदयी ईश्वरा
लाभले निजश्रेय माझे माझा आत्माराम हा
ॐ