भोगलोलुपता नांदते इकडे
दारिद्रयाचे मढे एकीकडे
एकाला मिळेना चिंधी ल्यावयाला
नाचे बारबाला वस्त्रहीन
गडगंज कुणी बांधले इमले
कष्टकरी चाले अनवाणी
दुस-याचे दु:ख आम्हा ना डाचत
रोटी नाही देत कुणा कधी
मग्रुरीचे सारे झालेत अधीन
विचारतो कोण सज्जनाला
वाईटाच्यासाठी चढाओढ चाले
सगळेच झाले कष्टी फार
अतिरेकापोटी जातात गाळात
कुतरओढीत प्राण जाई
*
आधार शोधू नको
आधार हो
*
या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थित:
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै
नमो नम:
ॐ