//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसूर्ये पाहो //
नका करू माझ्या /पृथ्वीला उजाड़ /
आता वृक्षतोड़ /बंद करा //१//
निळेशार पाणी /हिरवेगार रान /
चकाकते उन /आभाळात//२//
काय कमी केले /सांगा तुम्हा बरे /
नष्ट तुम्ही सारे /करताय //३//
जिवावर तुम्ही / सृष्टीच्या उठला /
विकास कसला /साधणार //४//
मातेला मारता /तुमचे पोषण /
करणार कोण /कृतघ्नांनो //५//
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २००८
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
