उलगडा मनाची दारे
सामाउन घ्या हो सारे
का उगा भेद भिंतींचा
आपलीच सारी घरे
खुलविण्या मनांच्या कळ्या
ही किती फुले धडपडती
शब्दांचा वाद कशाला
हसण्याला कष्ट न पडती
स्नेहाचे तृप्त धुमारे
हा विश्वतरु बाळगतो
एकसंध आस्तित्वाचा
अजेय गंध परिमळतो
रुजलेला ठायी ठायी
आनंद आहे आपलाच
प्रेमाला नाही सीमा
निष्कर्ष आहे इतकाच
आनंदा दृष्ट न लागो
ताटवे फुलोत सुखाचे
हे भाग्य आम्हाला लाभो
चेहरे तुमचे बघण्याचे
मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
