गोविंदा गोविंदा
रे गोविंदा गोविंदा
चराचरी तू
आत्मतत्वि तू
पंचप्राण माझा रे
गोविंदा गोविंदा
तुझ्यामधे हे जग उद्भवते
तुझ्यात स्थित आहे देवा
तुझ्यात याचा लय होतो रे
गोविंदा गोविंदा
'मी - तू ' पणाचा निरास केला
शब्दाचा भ्रम विरून गेला
आनंदाचा प्रकाश सा-या
जगात या दाटला रे
गोविंदा गोविंदा
रे गोविंदा गोविंदा
मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
