
तुज प्रार्थितो मी सद्गुरु अवधारी
नेई सुपंथे भवपैलतीरी
अज्ञानी बाळास काही कळेना
परि माउली तू विसरु नको ना
तुजविन मज कोणी नाही कृपाळा
धरी राग कैसा आपुल्याच बाळा
अपराध माझा जरी काही झाला
क्षमा करुनी पोटात घाला
चुकतो पुन्हा मी मज बुद्धि नाही
मज सावरुनी तू जवळी घेई
रे मी भुकेला मज ज्ञान देई
ते प्रेम पिउनी मी धन्य होई