
रामा कळकळुनी
करी मी विनवणी
बैस बा सिंहासनी
अयोध्येच्या
कोंडीले मी प्राण
पहावया क्षण
तुझे पदार्पण
वांछितो मी
तुझ्या प्रजाजना
सांगे वानरसेना
आला आला राणा
अयोध्येचा
देवा तुझ्या पाया
अंथरली काया
कृपा करी राया
रामचंद्रा
निजकर्तव्याला
कसा विसरला
प्रजापालनाला
चुकू नको
तुझ्या प्रेमाकरीता
व्याकुळली जनता
प्रतिसाद आता
देई रामा
ॐ