
सगुण रुसता निर्गुणासी जातो
जाता पस्तावतो दोन्हीकडे
देव न भेटता दु:ख मज देतो
भेटता करतो हाल माझे
देवा येरझारा उगा मी घालतो
त्रास हा सोसतो तुझ्यापायी
काय उणे दुणे तुझे मी काढले
ऋण का घेतले तुझे कधी
तुझिया नामाचा छंद हा वाईट
कुणी या फंदात पडू नये
राम कृष्ण हरी