
तुज आळविता / तुझे गुण गाता /
मोक्षाच्याही माथा / पाय ठेऊ //१//
कृपाळु राघवा / प्रेमाच्या अर्णवा /
सेवकाच्या जीवा / परब्रह्मा //२//
गोड तुझे नाम / गोड तुझे रूप /
स्नेहाचा तू दीप / दीपगृही //३//
इंद्रिये करती / कामे ठरलेली /
अंतरी मुरली / वाजतसे //४//
भवाच्या सागरी / तू माझा नावाडी /
तूच माझी होडी / पांडुरंगा //५//