ॐ
केशवा मला काम दे
अहंकार देऊ नको
सुख दु:ख दे हवे तर
क्षिती त्याची देऊ नको
माधवा मला काम दे
फळाची अपेक्षा नको
मान अपमान दे हवे तर
खेद खंत देऊ नको
आरंभिले सिद्धीस जावे
अथवा अधुरेच रहावे
यश अपयश मर्जी तुझी
लिप्त मन देऊ नको
जीव ओतून काम करावे
जशी काही लालूच असावी
खेळ पूर्ण झाल्यावर मात्र
त्यात रस देऊ नको
झाले गेले विसरून जावे
त्रयस्थाप्रमाणे सारे पहावे
पवित्र कर्मयज्ञ करावे
व्यथा चिंता नको नको
ॐ कृष्णार्पण ॐ