महाशून्याच्या घरी
आनंद आहे दाटला
शांततेच्या उंब-यावर
अहं भिरकाउन दिला
मुक्त आहे मुक्त आहे
भाव हा कोंदाटला
मूक झाले शब्द अन्
संवाद आहे संपला
मी कुणाला काय सांगू
नाही सामोरे कुणी
सर्व काही मीच आहे
काही इच्छा ना मनी
जाहलो मी पूर्णकाम
संपला व्यवहारही
सवे गेले ज्ञानाज्ञान
जिंकिले कैवल्यही
कर्म हे नैष्कर्म्य झाले
सोडणे काही न उरले
जाहलो अलिप्त मी अन्
साम्य द्वंद्वी पाहिले
ॐ