ॐ नम: शिवाय
*
काय त्या विषाचे
मोल असे बाबा
अमृताचा गाभा
सुखरूप
अनर्घ्य चोखडे
रत्न चिंतामणी
कामधेनु दानी
तुझी इच्छा
तुझी अन्नपूर्णा
विश्वाचा तू भर्ता
पुत्र विघ्नहर्ता
तुझा आहे
तात परब्रह्म
माय परब्रह्म
बाळ परब्रह्म
भेद नाही
तुज काय कमी
माय परब्रह्म
बाळ परब्रह्म
भेद नाही
तुज काय कमी
सांब सदाशिवा
आशुतोषा देवा
अनिकेता
मंथनाचे कष्ट
इतर दैवतां
तूच कृपादाता
सकळांसी
तूच देव साई
होऊनिया आला
कलियुगी झाला
तारक तू
*
ॐ नम: शिवाय
ॐ
त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम्
उर्वारुक्मिवबन्धनान् मृत्योर्मोक्षियमामृतात्
ॐ