
हे शत्रुसैन्य जमलेले
केवळ पेंढा भरलेले
संकल्प आहे हा माझा
यश तुझे आहे ठरलेले
उन्मत्त माजलेल्यांना
करूणा नाही कामाची
मी तुझा सारथी झालो
मारून टाक तू यांना
हे अधम पातकी वीर
झालेत भूमीला भार
अवतरलो आपण आता
धर्माला सावरणार
कर्माची खंत कशाला
पूर्णकाम मी असुनीही
उतरलो रणात सदेह
झुंजणे खेळ हा आपुला
करणारा मी हे जाण
तू निमित्त हो मरणाला
साम्राज्य पाहते वाट
हे नव्हे युद्ध हे पुण्य