
//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //
मन कोरी पाटी मन लख्ख आभाळ
मनाचे शुद्ध व शांत स्वरूप इतके आनंदमय असते की शब्दात वर्णन करता येत नाही.आनंदाचा वारा झुळकत असतो, आनंदाचे किरण चमकत असतात, आनंदाचा पाऊस बरसत असतो, आनंद पानापानात डोलत असतो, आनंद दगड बनुन थबकलेला असतो ;आणि हे सारे अकारण, निर्हेतुक, फक्त स्वत:साठी ! हे कुणाला सांगायचे नसते तरीही पक्षी गात असतात, कुणाला काही द्यायचे नसते तरीही झरे खळखळत असतात ! नक्षत्रे फुलत असतात आणि फुले उमलत असतात.आपण स्वत:ही अकारण, निर्हेतुक, पूर्णानंदस्वरूप असतो जेव्हा मन अविचलित असते.