
कल्पतरुच्या पायतळी
मी बसुनी गातो गाणे
सापडला सूर जिण्याचा
आनंदी मुक्त तराणे
नाही मज द्वेष कुणाचा
नाही भीती मरणाची
मुठभर सात्विक अन्न खाऊनी
चढे साय तृप्तीची
नाही उरली आकांक्षा
जे आहे तेच भरपूर
ना देतो त्रास कुणाला
मज किडा मुंगीही मित्र
नाही बुद्धीला ताण
वा नाही मनी संताप
मज शत्रु न वैरी कुणीही
नाही कसलाही व्याप
मी माझ्यापुरती जागा
घेतली करुनी साफ
आहे तो क्षण मोलाचा
जे मिळे सहज ते खूप