
हे माते शारदे,
तू परब्रह्मस्वरूपिणी आहेस
तू आम्हां सारस्वतांची माता सरस्वती आहेस
तशीच तू वैष्णवांची माता लक्ष्मी आहेस
व तूच शैवांची माता दुर्गा आहेस
तुझ्या अनुज्ञेशिवाय आम्हाला
सच्चिदानंद परमपित्याचे
दर्शन होत नाही
हे देवी, तू तुझ्या कृपाकटाक्षाने
माझ्या आज्ञाचक्रास स्पर्श करुन
मला ज्ञानदृष्टी प्रदान केलीस
हे माते ,मी त्रिनेत्र गणेश
माझ्या ऋद्धि सिद्धि सह
तुझ्या चरणी नमन करतो
नवविधा भक्तिरूपी माझ्या र्हिदयसिंहासनी
विराजमान हो व मला पावन कर