रंग मधाळ रानाचा
माझ्या उतरे उरात
रंग निळ्या आभाळाचा
माझ्या पसरे डोळ्यात
नक्षी पर्णसंभाराची
देई अर्थ जीवनाला
भुईवर कवडसे
देती सुगंध सोन्याला
नाही कसा मी म्हणू या
पर्वतांना व द-यांना
देती हजारो हातांनी
दान खळाळा झ-यांना
रिमझिम पावसाळा
कसा आहे हा उदार
उगवतो दगडात
जोमदार वृक्षांकुर
अशी श्रीमंती दाटते
हिरव्या या निसर्गाची
जणू लागते लॉटरी
रोज माझ्या नशिबाची
*