गुरुवार, २३ मार्च, २०१७
शनिवार, ४ मार्च, २०१७
अनुभूती
ॐ
अलौकिकाचा हात धरावा
लौकिक सारे सुटून जावे
तुझी ईश्वरा अनुभूती येता
जग हे सारे लयास जावे
मर्जी तुझी का माझ्यावर ही
कधी ना याचे गणित सुटावे
वेड लागले नादखुळ्याला
मजवर जग हे असे हसावे
मी का गुंतू जगदाभासी
रहस्य यांना कसे कळावे
लडबडले कर्मातच सारे
समाधीसुख यांना ना ठावे
भान रहावे तव एकाचे
तू माझ्यावर प्रेम करावे
पर्वा नाही कुणाची असे
भक्तीमध्ये रममाण मी व्हावे
अद्भुत नाते तुझे नि माझे
सगळे जगत अचंभित व्हावे
असे करू नको असे करू नको
जगाने मला समजावावे
ॐ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
