।। सोहं।।
मी माझ्या खोलीत येऊन पलंगावर दमून आडवा पडलो. तेव्हा कृष्ण मला म्हणाला, "देवा, मला तुझ्याशिवाय दुसरे कुणीही नाही."
हे म्हणताना तो माझ्या पायांशेजारी बसून हळूवारपणे माझे पाय दाबत होता. माझ्या दुखणाऱ्या पायांना आराम मिळत होता.
ही हकीकत मी सक्सेनाजींना सांगितली व म्हणालो, "काही कळत नाही, श्री विठ्ठल असे का करतो. मीच शरमिंदा होतो."
त्यानंतर कृष्णाने मला रागाने विचारले, "काय रे, तू हे काय बडबडत होतास ? हा देह तुझा आहे का ?"
त्यावर मी वरमून म्हणालो, "नाही पांडुरंगा."
मग कृष्णाने मला विचारले, "आणि हे पायही तुझे आहेत का ?"
मी म्हणालो, "नाही पांडुरंगा; हा देह पण तुझाच आहे, हे पायसुद्धा तुझेच आहेत व उरलासुरला 'मीपण' पूर्णपणे तुझाच आहे. माझे असे काही एक नाही."
त्यावर कृष्ण नरमून मला म्हणाला, "देवा, पुन्हा कधी स्वतःकडे मोठेपणा घेऊ नको. मी माझीच सेवा करत असतो. त्यात 'तुझी' अशी काहीच भूमिका नसते."
मी म्हणालो, "क्षमा कर भगवंता. चूक झाली."
कृष्ण मला म्हणाला, "देवा, पुन्हा कधी स्वतःला माझ्यापासून वेगळा समजू नकोस. फार राग येतो मला."
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः
करिष्ये वचनं तव।।
जन विजन झाले आम्हा ।
विठ्ठलनामा प्रमाणे ॥१॥
पाहे तिकडे मायबाप ।
विठ्ठल आहे रखुमाई ॥२॥
वन पट्टण एकभाव ।
अवघा ठाव सरता जाला ॥३॥
आठव नाही सुखदु:खा ।
नाचे तुका कौतुके ॥४॥
जगन्नाथ रथयात्रा
।। कृष्णार्पण।।
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारीमार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदो उदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्