देवा तुज देऊ / काय खेळावया /
मन बुद्धि काया / तुझी आहे //१//
मागसी मजला / हात पसरून /
तुज त्रिभुवन / कमी पड़े //२//
मजकडे नाही / स्वतःचे काहीच /
तुजला तुझेच / देत आहे //३//
वाढवुनी माझा / क्षुद्र अहंकार /
फसविसी फार / पुन्हा पुन्हा //४//
करिसी कृतार्थ / खेळण्याच्या मिसे /
लावियले पिसे / मज तुझे //५//
गुरुवार, २९ नोव्हेंबर, २००७
चिंध्या
कपड्यांच्या चिंध्या / देवा छान केल्या /
विठ्ठला आतल्या / पाहिले मी //१//
काय ही कामाची / आवरणे खोटी /
सारगर्भ हाती / येत नाही //२//
जड़ जीव गेले / राम विसरून /
देहाला धुऊन / धन्य झाले //३//
आंबा असे गोड / मिरची तिखट /
जांभुळ तुरट / कृपा एक //४//
पंथ धर्म नाना / श्रद्धा वेगळाल्या
देवाने निर्मिल्या / तूच एका //५//
विठ्ठला आतल्या / पाहिले मी //१//
काय ही कामाची / आवरणे खोटी /
सारगर्भ हाती / येत नाही //२//
जड़ जीव गेले / राम विसरून /
देहाला धुऊन / धन्य झाले //३//
आंबा असे गोड / मिरची तिखट /
जांभुळ तुरट / कृपा एक //४//
पंथ धर्म नाना / श्रद्धा वेगळाल्या
देवाने निर्मिल्या / तूच एका //५//
शनिवार, १० नोव्हेंबर, २००७
शंभू
माझिया मनाच्या अढळ आकाशी
पुर्णमात्रे भरला वैराग्य सुवास
शुभंकरा तुझे रूप हे उदास
अगम्य शांती मज देते
चिदाकाशी उमटे ओंकाराचा ध्वनी
करुणा ओसंडते मिटल्या त्रिनयनी
कैलासाच्या शिखरी बसला पिनाकपाणि
त्रिभुवनाचे हित कवेमधे
कर्पुरगौर शिव हिमगौर पर्वत
चंद्रकोरीतुन बरसते अमृत
सहस्त्रारकमळी पोहोचले आस्तित्व
आनंदाच्या लाटा उसळती
पुर्णमात्रे भरला वैराग्य सुवास
शुभंकरा तुझे रूप हे उदास
अगम्य शांती मज देते
चिदाकाशी उमटे ओंकाराचा ध्वनी
करुणा ओसंडते मिटल्या त्रिनयनी
कैलासाच्या शिखरी बसला पिनाकपाणि
त्रिभुवनाचे हित कवेमधे
कर्पुरगौर शिव हिमगौर पर्वत
चंद्रकोरीतुन बरसते अमृत
सहस्त्रारकमळी पोहोचले आस्तित्व
आनंदाच्या लाटा उसळती
रविवार, ४ नोव्हेंबर, २००७
साहेब
देवा मज नको / बळ बुद्धि धन /
तुज माझे मन / स्मरो नित्य //१//
नको मला देवा / तंदुरुस्त होणे /
बरे दीनवाणे / माझे सोंग //२//
नको अहंकार / चुकून मजला /
शपथ तुजला / देवा माझी //३//
तुझी तू चालव / माझी रोजीरोटी /
दया तुझी मोठी / माझ्यावर //४//
कळो वा न कळो / तुझी शक्ती कोणा /
सर्वशक्तिमाना / जाणले मी //५//
कशाला दाखऊ / फुकाचा रुबाब /
तू माझा साहेब / पांडुरंगा //६//
तुझी धर्मध्वजा / तूच मिरवीतो /
धनी आम्ही होतो / नाममात्र //७//
अंगाखांद्यावर / तुझ्या विठुराया /
बाळे बागडाया / आसुसलो //८//
प्रेमाची बिरुदे / धारण तू केली /
बाप व माउली / तूच एक //९//
तुज माझे मन / स्मरो नित्य //१//
नको मला देवा / तंदुरुस्त होणे /
बरे दीनवाणे / माझे सोंग //२//
नको अहंकार / चुकून मजला /
शपथ तुजला / देवा माझी //३//
तुझी तू चालव / माझी रोजीरोटी /
दया तुझी मोठी / माझ्यावर //४//
कळो वा न कळो / तुझी शक्ती कोणा /
सर्वशक्तिमाना / जाणले मी //५//
कशाला दाखऊ / फुकाचा रुबाब /
तू माझा साहेब / पांडुरंगा //६//
तुझी धर्मध्वजा / तूच मिरवीतो /
धनी आम्ही होतो / नाममात्र //७//
अंगाखांद्यावर / तुझ्या विठुराया /
बाळे बागडाया / आसुसलो //८//
प्रेमाची बिरुदे / धारण तू केली /
बाप व माउली / तूच एक //९//
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
