
येणे जाणे आभास
नित्यता अबाधित आहे
मारणार कोण कुणाला
थांबेल फक्त हा श्वास
शुन्यातुन कोण आले का
शुन्यात कोण मिळणार
आस्तित्व सदोदित आहे
करू नको शोक हा फुका
हा खेळ युगानुयुगांचा
हे व्यक्त मिळे अव्यक्ता
बदलते दशा ही फक्त
फरक हा रंगरुपाचा
येईल पुन्हा जन्माला
अव्यक्तच रंगरुपाला
हे चक्र जगाचे चाले
पडणार खंड ना याला
जाणीव ही नित्यत्वाची
होणेच पुरेसे आहे
मग शोक दु:ख तक्रार
नाही उरणार कशाची