परब्रह्म स्वये घेई अवतारा
आनंद साजरा करावया
.
थंड दुर्वांकुर तुरा माथ्यावर
.
थंड दुर्वांकुर तुरा माथ्यावर
जास्वंदाचा हार गळ्यामध्ये
अथर्वशीर्षाचा गंभीर उच्चार
विघ्नबाधा दूर नाम घेता
गणेश लीळेचे करुया कौतुक
अथर्वशीर्षाचा गंभीर उच्चार
विघ्नबाधा दूर नाम घेता
गणेश लीळेचे करुया कौतुक
मोदक साजूक देऊ त्याला
.
नाचूया आनंदे वाजवीत ढोल
.
नाचूया आनंदे वाजवीत ढोल
उधळू गुलाल समाधाने
.
ताशा तडाडता पाय थिरकावे
.
ताशा तडाडता पाय थिरकावे
लेझीम खेळावे हर्षोत्फुल्ल
करू रोषणाई देखावे सुंदर
देवा राज्य कर दिमाखाने
ॐ गं गणपतये नम: