ॐ
वस्त्रामध्ये तंतू
विना काही नाही
तैसा हरी पाही
चराचरी
ठासून भरला
भरून उरला
सर्वत्र कोंदला
एक हरी
एका हरीविना
अन्य नाही काही
सर्वत्र मी पाही
फक्त हरी
नाही उरला बा
येण्याचा जाण्याचा
देण्याचा घेण्याचा
व्यवहार
देहाच्या योगाने
कर्म काही घडे
त्याचे नाही कोडे
मला देवा
कर्ता परब्रह्म
कर्म परब्रह्म
फल परब्रह्म
आहे देवा
ॐ