उलगडा मनाची दारे
सामाउन घ्या हो सारे
का उगा भेद भिंतींचा
आपलीच सारी घरे
खुलविण्या मनांच्या कळ्या
ही किती फुले धडपडती
शब्दांचा वाद कशाला
हसण्याला कष्ट न पडती
स्नेहाचे तृप्त धुमारे
हा विश्वतरु बाळगतो
एकसंध आस्तित्वाचा
अजेय गंध परिमळतो
रुजलेला ठायी ठायी
आनंद आहे आपलाच
प्रेमाला नाही सीमा
निष्कर्ष आहे इतकाच
आनंदा दृष्ट न लागो
ताटवे फुलोत सुखाचे
हे भाग्य आम्हाला लाभो
चेहरे तुमचे बघण्याचे
मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८
शिवोहम्
शिवाची तपोभूमि गिरिस्थान कुहरी
मांगल्य नांदते निबिड़ वनांतरी
आल्हादाचा वारा तना स्पर्श करी
पवित्र शांतता मनाच्या गाभारी
शिवयोगी पूर्णकाम , आसमंत नित्यतृप्त
थबकला काळ स्वये स्वानंद भुवनात
पक्ष्यांचा मधुर स्वर , गोड गाई निर्झर
लाभे संगीताचा शांतीस अलंकार
उमटे अंतर्नाद अनाहत ॐकार
अनुभुतीला येई परब्रह्म साकार
अविद्येचा नाश होउनी सत्वर
शिवोहम् चा करतो मी आनंदे उच्चार
मांगल्य नांदते निबिड़ वनांतरी
आल्हादाचा वारा तना स्पर्श करी
पवित्र शांतता मनाच्या गाभारी
शिवयोगी पूर्णकाम , आसमंत नित्यतृप्त
थबकला काळ स्वये स्वानंद भुवनात
पक्ष्यांचा मधुर स्वर , गोड गाई निर्झर
लाभे संगीताचा शांतीस अलंकार
उमटे अंतर्नाद अनाहत ॐकार
अनुभुतीला येई परब्रह्म साकार
अविद्येचा नाश होउनी सत्वर
शिवोहम् चा करतो मी आनंदे उच्चार
गोविंदा
गोविंदा गोविंदा
रे गोविंदा गोविंदा
चराचरी तू
आत्मतत्वि तू
पंचप्राण माझा रे
गोविंदा गोविंदा
तुझ्यामधे हे जग उद्भवते
तुझ्यात स्थित आहे देवा
तुझ्यात याचा लय होतो रे
गोविंदा गोविंदा
'मी - तू ' पणाचा निरास केला
शब्दाचा भ्रम विरून गेला
आनंदाचा प्रकाश सा-या
जगात या दाटला रे
गोविंदा गोविंदा
रे गोविंदा गोविंदा
रे गोविंदा गोविंदा
चराचरी तू
आत्मतत्वि तू
पंचप्राण माझा रे
गोविंदा गोविंदा
तुझ्यामधे हे जग उद्भवते
तुझ्यात स्थित आहे देवा
तुझ्यात याचा लय होतो रे
गोविंदा गोविंदा
'मी - तू ' पणाचा निरास केला
शब्दाचा भ्रम विरून गेला
आनंदाचा प्रकाश सा-या
जगात या दाटला रे
गोविंदा गोविंदा
रे गोविंदा गोविंदा
राम राम बोल मना
राम राम बोल मना
राम राम बोल मना
धाउनिया येतो तो
आत्मबोध जागवितो
पायांचा त्याच्या तू
छंद जोड़ ना
आराम घेई रे
चंचलता सोडून दे
शांतीच्या ठायी तू
चित्त जिरव ना
रे रामा माझ्यावर
तुझी कृपा होऊ दे
असे मना आळव त्या
पतितपावना
रामरूप होउनी
रामनाम घेशील तू
त्याच्या इच्छेवरती
सोड कामना
सारे जग रामरूप
त्याचा त्यालाच व्याप
स्वच्छंदी आनंदी
निर्भय हो ना
राम राम बोल मना
धाउनिया येतो तो
आत्मबोध जागवितो
पायांचा त्याच्या तू
छंद जोड़ ना
आराम घेई रे
चंचलता सोडून दे
शांतीच्या ठायी तू
चित्त जिरव ना
रे रामा माझ्यावर
तुझी कृपा होऊ दे
असे मना आळव त्या
पतितपावना
रामरूप होउनी
रामनाम घेशील तू
त्याच्या इच्छेवरती
सोड कामना
सारे जग रामरूप
त्याचा त्यालाच व्याप
स्वच्छंदी आनंदी
निर्भय हो ना
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
